मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर आज काय घडते? याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराला शेअर मार्केटने लाल चिन्हाने सुरुवात केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण पहायला मिळत आहे. निफ्टी 17450 च्या खाली आला आहे. आयटी शेअर्सच्या विक्रीमुळे शेअर मार्केटवर दबाव वाढला आहे. मेटल आणि ऑटो शेअर्सही घसरत आहेत. पण निफ्टी बँक हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. सध्या सेन्सेक्समध्ये 18 अंकांची घसरण असून तो 59,393.04 च्या पातळीवर आहे. तर निफ्टी 16 अंकांच्या घसरणीनंतर 17,434.70 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
टॉप गेनर्स, टॉप लूजर्स
सेन्सेक्स 30 चे 23 शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये बजाज (BAJAJFINSV), एलटी (LT), टाटा स्टील (TATASTEEL), टायटन (TITAN), एचडीएफसी बँक (HDFCBANK) यांचा समावेश आहे. तर टॉप लूजर्समध्ये एम अँड एम (M&M), इन्फोसिस (Infosys), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra), एक्सिस बँक (Axis Bank), मारुती (Maruti), एसबीआय (SBI), विप्रो (Wipro) यांचा समावेश आहे.
यूएस मार्केटमध्ये संमिश्र कल
बुधवारी अमेरिकन मार्केटमध्ये संमिश्र कल दिसून आला. डाऊ जोन्स 5.14 अंकांनी किंवा 0.02 टक्क्यांनी किंचित वाढला आणि 32,661.84 च्या पातळीवर बंद झाला. एस अँड पी (S&P) 500 निर्देशांक 18.76 अंकांनी घसरून 3,951.39 वर बंद झाला. तर नॅस्डॅक कंपोझिट 76.06 अंकांनी घसरुन 11,379.48 च्या पातळीवर बंद झाला.
कोणत्या क्षेत्राने नफा मिळवला?
आजचा व्यवसाय सेक्टरनुसार बघितला तर निफ्टी मीडिया, प्रायव्हेट बँक यांनी चांगली सुरुवात केली आणि नफा कमावला. दुसरीकडे, आयटी निर्देशांकाची स्थिती आज खराब आहे आणि या क्षेत्रात सुमारे 1 टक्के घसरण दिसून येत आहे. निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 आज प्रत्येकी 0.2 टक्क्यांनी वाढले आहेत.
Source: https://bit.ly/41xpQ2x
https: https://bit.ly/3J57Fd6