Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर बाजार माहिती: पूट खरेदी करायचाय?

शेअर बाजार माहिती: पूट खरेदी करायचाय?

जाणून घ्या Option Trading मधील पूट खरेदी बद्दल

शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. अशी घसरण झाल्यानंतर दुसर्या दिवशी आपण गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याच्या बातम्या पाहतो. पण अशी घसरण ही काहींना अक्षरशः मालामाल करुन जाते. कोण असतात हे लाभार्थी? ते असतात पूट खरेदी करणारे!

पूट हा कॉलच्या अगदी विरुद्ध प्रकार आहे. म्हणजे समजा आपल्याला बाजारात किंवा बँकिंगच्या निर्देशांकात घसरण होणार आहे, असे वाटत असल्यास आपण Nifty किंवा Bank Niftyचा पूट खरेदी करू शकतो.
उदाहरणार्थ, निफ्टीचा 17800 अंकपातळी असणारा पुट आपण 250 रुपयांना खरेदी केला असेल आणि बाजारात जोरदार घसरण झाली तर साहजिकच आपल्या या पूटची किंमत वाढते. ती वाढत जाऊन समजा 400 रुपये झाली तर आपल्याला मिळणार नफा हा 150 गुणिले 50 (लॉट साईज) म्हणजे 7500 रुपये इतका होतो. प्रत्यक्षात आपण गुंतवलेली रक्कम असते 12,500 रुपये! याचाच अर्थ 60 टक्क्यांहून अधिक नफा! तोही काही तासांत किंवा मिनिटांत!

याउलट जर बाजारात घसरण न होता तो वधारत वरच्या अंकपातळीवर गेल्यास सदर गुंतवणुकीतून नुकसान होते. कॉल किंवा पूट खरेदी केल्यानंतर त्यातून बाहेर पडण्याचे म्हणजेच तो व्यवहार संपुष्टात आणण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. पण समजा गुरुवारी साप्ताहिक समाप्ती (Weekly Expiry)च्या दिवसा अखेरपर्यंत आपण कॉल अथवा पूटची विक्री केली नाही तर 3.30 वाजता ज्या पातळीवर, ज्या किमतीला तो असेल तिथे तो व्यवहार संपवला जातो.

शक्यतो कॉल अथवा पूट हे इंट्राडेसाठी घेतले जातात. समजा आपण खरेदी केलेल्या दिवशी त्या कॉल किंवा पूटची किंमत घसरली आणि आपल्याला जर ती दुसर्या-तिसर्या दिवशी वाढू शकते असा अंदाज असेल तर आपण ती कॅरी फॉरवर्ड (Carry Forward) करु शकतो. यासाठी खरेदी करताना इंट्राडेऐवजी नॉर्मल (Normal) या की-वर्डचा पर्याय निवडावा लागतो. एकदा खरेदी केलेली स्ट्राईक प्राईस (Strike Price) इंट्राडेमधून नॉर्मलला तो ट्रान्स्फर करता येत नाही.

ज्या मंडळींना बाजाराचे अचूक आकलन-अभ्यास झालेला असतो असे कसलेले गुंतवणूकदार एकाहून अधिक लॉट विकत घेतात. जितके लॉट अधिक तितकी गुंतवणूक अधिक असली तरी होणारा नफाही मोठा असतो! Call आणि Put मध्ये इन द मनी (In the Money), अॅट द मनी (At the Money), आऊट द मनी (Out the Money) असे प्रकार आहेत.