Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Stock : सर्व्होटेकचा 'पॉवर'फुल परफॉर्मन्स, वर्षभरात गुंतवणूकदारांना 1400 टक्क्यांचा भरघोस परतावा

Multibagger Stock : सर्व्होटेकचा 'पॉवर'फुल परफॉर्मन्स, वर्षभरात गुंतवणूकदारांना 1400 टक्क्यांचा भरघोस परतावा

Image Source : www.hindi.economictimes.com

Multibagger Stock : सर्व्होटेकनं दमदार अशी कामगिरी शेअर बाजारात करून दाखवली आहे. आपल्या गुंतवणूकदारांना बंपर असा परतावा कंपनीनं दिला आहे. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटला आले. त्यानंतर शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उसळी पाहायला मिळाली.

सर्व्होटेक पॉवर सिस्टमच्या (Servotech Power Systems) शेअर्सनं सातत्यानं चांगली कामगिरी केल्यानं गुंतवणूकदार खूश आहेत. मागच्या दोन-तीन दिवसांचा आढावा घेतल्यास शेअर्स कसे वधारले ते लक्षात येईल. शुक्रवारी शेअर्सला अपर सर्किट लागलं. याचं महत्त्वाचं कारण असं, की नव्या आयएसआयएन (ISIN) नंबरसह या शेअरमध्ये एक्स स्प्लिट ट्रेंड झालं होतं. त्याआधी गुरुवारी सर्व्होटेक पॉवरनं आपली एक उपकंपनी निर्माण केली होती. त्यानंतर या सर्व घडामोडी पाहायला मिळाल्या.

सर्व्होटेकची नवी कंपनी

सर्व्होटेकचे शेअर उसळी घेण्यात या नव्या कंपनीचाही वाटा आहे. गुरुवार 27 जुलै 2023ला टेकबेक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अशी नवी कंपनी स्थापन करण्यात आली. खरं तर ही एक सहाय्यक कंपनी आहे. एकूण व्यापार तसंच बॅटरीचं उत्पादन अशी प्रमुख कामं या नव्या कंपनीमार्फत केली जाणार आहेत.

मल्टिबॅगर रिटर्न

सर्व्होटेकच्या शेअरनं मल्टिबॅगर परफॉर्मन्स दिला आहे. मागच्या एका वर्षाच्या कालावधीत शेअरनं 1395 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं एका वर्षापूर्वी शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याचं आजचं मूल्य 14.95 लाख रुपये झालेलं असणार आहे. या वर्षभरात शेअरमध्ये 461.46 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. याचा अर्थ ज्याद्वारे 1 लाख रुपये वर्षाच्या सुरुवातीला गुंतवले गेले असतील, त्याचं मूल्य आजघडीला 5.61 लाख रुपये झालं असतं.

मागच्या 6 महिन्यातली कामगिरी

कंपनीच्या शेअरची मागच्या 6 महिन्यातली कामगिरी पाहता 290 टक्क्यांची उसळी दिसून आली. त्याचा हिशोब करू. ज्यांनी 6 महिन्यांपूर्वी पैसे गुंतवले असतील, त्याचं मूल्य आता 3.90 लाख रुपये झालं असतं. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 200 रुपये तर नीचांक 11.51 रुपये आहे. सध्या कंपनीचा शेअर अपर सर्किटसह 90.90 रुपयांवर आहे. तर कंपनीचं एकूण बाजार भांडवल 1925 कोटी रुपये आहे.

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)