Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Rise: शेअर बाजारात तेजीची बरसात, सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला

share market

Image Source : www.businesstoday.in

Sensex Rise:बाजारात सध्या तिमाही निकालांचा प्रभाव जाणवत आहे. आयटीपासून ऑटो कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे.

शेअर बाजारात आज बुधवारी सकाळच्या सत्रात तेजीची लाट धडकली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 112 अंकांच्या तेजीसह 19793 अंकांवर ट्रेड करत आहे.

बाजारात सध्या तिमाही निकालांचा प्रभाव जाणवत आहे. आयटीपासून ऑटो कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. याशिवाय दर महिन्याला सरकारला वस्तू आणि सेवा करातून चांगला महसूल मिळत आहे. परिणामी अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

आज बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 200 अंकांची झेप घेतली होती. बीएसई मंचावरील टाटा मोटर्स , एनअ‍ॅंडटी, पॉवरग्रीड, इन्फोसिस, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, आयटीसी, एनटीपीसी एसबीआय, भारती एअरटेल या शेअरमध्ये वाढ झाली. टीसीएस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अ‍ॅंड महिंद्रा, एशियन पेंट या शेअरमध्ये घसरण झाली.

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हकडून बुधवारी रात्री मागील बैठकीचे इतिवृत्त जाहीर केले जाणार आहे. यात बँकेची व्याजदराबाबतची भविष्यातील भूमिका स्पष्ट होईल. याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असल्याचे मेहता इक्विटीजचे शेअर बाजार विश्लेषक प्रशांत तापसे यांनी सांगितले. ते म्हणाले की फेडरल चेअरमन जेरोम पॉवेल हे जुलै आणि ऑगस्टमधील महागाईचा अंदाज घेऊन व्याजदरांबाबत रणनिती ठरवतील.

आजच्या सत्रात लार्सन अ‍ॅंड टुब्रोचा शेअर 4% ने वधारला आणि तो 2664 रुपयांवर गेला. एलअ‍ॅंडटीने मंगळवारी पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. यात कंपनीच्या नफ्यात 46.5% वाढ झाली. याशिवाय कंपनीने 10 हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले.

टाटा ग्रुपमधील टाटा मोटर्स, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्प, टाटा कम्युनिकेशन हे शेअर तेजीत आहेत. त्याशिवाय अदानी ग्रीन एनर्जी, ज्योती लॅब्स, केईसी इंटरनॅशनल या शेअरमध्ये वाढ झाली. सध्या सेन्सेक्स 463 अंकांच्या तेजीसह 66819 अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी 121 अंकांच्या वाढीसह 19802 अंकांवर आहे.