परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर गुंतवणुकीने आज बुधवारी 28 जून 2023 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 64000 अंकांच्या रेकॉर्ड पातळीवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने 19000 अंकांची पातळी ओलांडली.
आजच्या सत्रात सेन्सेक्स 591 अंकांनी वधारला असून निफ्टीत 181 अंकांची वाढ झाली. या तेजीने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान 2 लाख कोटींनी वाढली.
आजच्या सत्रात सार्वजनिक बँका, कन्झुमर ड्युरेबल्स, मेटल्स, ऑटो या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आहे. बीएसई आणि निफ्टीवरील सर्व सेक्टर्समध्ये तेजीचे वातावरण आहे. शेअर मार्केटमध्ये 1961 शेअर तेजीत आहेत.
बीएसई सेन्सेक्स मंचावर टाटा मोटर्स, टायटन, रिलायन्स, एलअॅंडटी, सन फार्मा, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, एसबीआय, टीसीएस, एशियन पेंट्स, एचडीएफसी, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये वाढ झाली.
अदानी एंटरप्राईसेस, वोडाफोन आयडिया, इन्फिबीम अव्हॅन्यूज, आदित्य बिर्ला कॅपिटल, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
उद्या गुरुवारी 29 जुलै 2023 रोजी बकरी ईद निमित्त शेअर मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे आज जून महिन्याची वायदेपूर्ती असल्याने बाजारात तेजी दिसून आल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे.