वाढते वय कोणासाठी थांबत नाही. तसेच वय वाढले की काही लहान-मोठे आजारही आपोआप मागे लागतात. त्यामुळे उतारवयासाठी पुरेसा आणि चांगला हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. नाहीतर वाढत्या वयाबरोबर पैशांचा भारही सहन करावा लागू शकतो.
तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण किंवा तुम्ही स्वत: सिनिअर सिटीझन (ज्येष्ठ नागरिक) असाल तर हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्या फायनान्शिअल गोलचा महत्त्वाचा भाग असायला हवा. तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आरोग्याशी संबंधित विविध सुविधांपासून, जसे की, इन्शुरन्स कव्हर, कॅशलेस हॉस्पिटायझेशन, अॅम्ब्युलन्सचा खर्च, वर्षाला केली जाणारी मेडिकल टेस्ट यापासून वंचित राहाल आणि त्यासाठी तुम्हाला भरमसाठ पैसेही खर्च करावे लागतील.
त्यामुळे आम्ही तुमच्या पालकांसाठी, ओळखीतील सिनिअर सिटीझन्ससाठी फायद्याच्या ठरतील अशा भारतातील काही निवडक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. हे प्लॅन 2023 मधील आहेत.
Table of contents [Show]
Aditya Birla Active Care Plan
आदित्या बिर्ला कंपनीचा हा सिनिअर सिटीझन्ससाठीचा बेस्ट प्लॅन मानला जातो. हा प्लॅन घेण्यासाठी किमान वयाची अट 55 वर्षे तर कमाल वय 80 वर्षे आहे. म्हणजे वयाच्या 80 वर्षापर्यंत तुम्ही हा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता. याची इन्शुरन्सची रक्कम 3 लाखापासून 25 लाखापर्यंत आहे. तसेच कॅशलेस पद्धतीने पॉलिसीधारकासाठी 10 हजारांहून अधिक हॉस्पिटल्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- खरेदी केलेल्या पॉलिसीचे नुतनीकरण केल्यानंतर वार्षिक हेल्थ चेक-अप फ्री
- पॉलिसीमध्ये डे-केअरमधील 586 प्रक्रियांचा सहभाग
- हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरातून घेतलेल्या उपचारांच्या खर्चाचा सहभाग
- 30 दिवस प्री-हॉस्पिटायझेशन आणि 60 दिवस पोस्ट हॉस्पिटायझेशन खर्चाच सहभाग
Star Health Senior Citizens Red Carpet
स्टार हेल्थ कंपनीचा सिनिअर सिटीझन रेड कार्पेट हा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन वयाच्या 60 वर्षानंतर ते 75 वर्षापर्यंत खरेदी करता येतो.याची इन्शुरन्सची रक्कम 1 लाखापासून 25 लाखापर्यंत आहे. तसेच कॅशलेस पद्धतीने पॉलिसीधारकासाठी 10 हजारांहून अधिक हॉस्पिटल्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- या पॉलिसीतून वैयक्तिक पातळीवर 25 लाखापर्यंत कव्हर उपलब्ध आहे.
- फ्लोटर बेसिसवर यातून 10 ते 25 लाखापर्यंतचा लाभ मिळू शकतो.
- पॉलिसी खरेदी करताना मेडिकल टेस्ट करण्याची गरज नाही.
- प्रीमिअम 3 महिने किंवा 6 महिन्यांनी भरता येतो.
Care Health Insurance Senior Citizen Policy
केअर हेल्थ इन्शुरन्स सिनिअर सिटीझन पॉलिसी ही वयाच्या 61 वर्षापासून ते पुढे कितीही वर्षापर्यंत काढता येते. याची विम्याची रक्कम 3 लाखापासून ते 10 लाखापर्यंत आहे. या पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारकाला 19,000 कॅशलेस हॉस्पिटल्सचा पर्याय उपल्बध आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- यामध्ये हॉस्पिटायझेशनच्या काळातील सर्व खर्च समाविष्ट होतात.
- तसेच आयुष योजनेंतर्गत 20,000 रुपयांपर्यंतचा खर्च देखील यात समाविष्ट होतो.
- हॉस्पिटायझेशनच्या 30 दिवसांपूर्वीचे अत्याधुनिक उपचार पद्धती, मेडिकल रिपोर्ट-टेस्ट, रुटीन मेडिकल चेकअप यांच्या खर्चाचा समावेश होतो
- अवयवदानाशी संबंधित 1 लाखाचा खर्च देखील यात कव्हर होतो.
Niva Bupa Senior First Health Policy
निवा भूपा सिनिअर फर्स्ट हेल्थ पॉलिसी ही वयाच्या 61 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत खरेदी करण्याची सुविधा देते. या पॉलिसीमधून पॉलिसीधारकाला 5 लाखापासून 25 लाखापर्यंतची विम्याची रक्कम मिळू शकते. तसेच निवा भूपा पॉलिसीच्या मदतीने तुम्ही जवळपास 8,600 हॉस्पिटलमधून कॅशलेस पद्धतीने उपचार करून घेऊ शकता.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- ही पॉलिसी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे; गोल्ड आणि प्लॅटिनिअम प्लॅन
- याची Sum insured रकमेची रेंज 5 लाखपासून 25 लाखापर्यंत आहे.
- हॉस्पिटायझेशनच्या अगोदर 60 दिवस आणि डिस्चार्जनंतर 180 दिवसांचा खर्च अंतर्भूत होतो.
- नियमित अॅम्ब्युलन्ससाठी 2 हजार तर एअर अॅम्ब्युलन्ससाठी 2.5 लाखापर्यंत खर्च अंतर्भूत होतो.
Bajaj Allianz Health Insurance for Senior Citizens-Silver Health Plan
बजाज अलायन्झ कंपनीचा सिनिअर सिटीझन सिल्व्हर हेल्थ प्लॅन वयाच्या 45 वर्षानंतर खरेदी करता येतो आणि त्याची कमाल मर्यादा 70 वर्षे आहे. यासाठी 50 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंतचा इन्शुरन्स मिळू शकतो. तसेच या पॉलिसी अंतर्गत 8 हजारांहून अधिक हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस पद्धतीने उपचार घेता येतात.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- या पॉलिसीसाठी प्री-मेडिकल बंधनकारक आहे. तसेच यातून एक फ्री हेल्थ चेकअप मिळतो.
- पॉलिसी खरेदी केल्यानंतर मागील एका वर्षापर्यंतच्या आजारांना कव्हर मिळतो.
- कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 5 टक्के सवलत मिळण्याची सुविधा.
- डे-केअर उपचारांमधील जवळपास 130 प्रक्रियांच्या खर्चाचा पॉलिसीमध्ये समावेश होतो.
HDFC ERGO My Health Suraksha
एचडीएफसी ईर्गोची माय हेल्थ सुरक्षा ही पॉलिसी कोणत्याही वर्षी खरेदी करता येते. यासाठी कंपनीने किमान आणि कमाल कालावधी ठेवलेला नाही. यातून पॉलिसीधारकाला 3 लाखापासून 75 लाखापर्यंतचा इन्शुरन्स मिळू शकतो. तसेच या पॉलिसी अंतर्गत 13 हजारांहून अधिक हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस पद्धतीने उपचार घेता येतात.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- हॉस्पिटलमधील उपचारासाठी प्रति दिन 5 ते 10 हजारांपर्यंच्या रूमची निवड करू शकता.
- रोड आणि एअर अशा दोन्ही अॅम्ब्युलन्सचा खर्च अंतर्भूत होतो.
- हॉस्पिटायझेशनच्या पूर्वी 60 दिवस आणि डिस्चार्जनंतर 180 दिवसांपर्यंत खर्च कव्हर होतो.
- पॉलिसीचा प्रीमिअम 3 किंवा 6 महिने किंवा वर्षाने भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.