भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI) बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) आणि एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज) वर दंड ठोठावला आहे. हा दंड ब्रोकरेज फर्म कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. कार्व्हीने गुंतवणूकदारांच्या 2300 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर करण्याबाबत दोन्ही स्टॉक एक्सचेंजने कोणतीही पावले उचलली नसल्याचा आरोप ठेवत, सेबीने या दोन्ही एक्सचेंजवर दंड ठोठावला आहे. सेबीने बीएसईला 3 कोटी आणि एनएसईला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
BSE, NSE Penalised By SEBI Over Laxity In Karvy Stock Broking Case https://t.co/xZ0JK3X3Be pic.twitter.com/VBtAtKAtV8
— NDTV Profit (@NDTVProfit) April 13, 2022
कार्व्हीने एका स्वतंत्र डिमॅट खात्यातून 95 हजारांहून अधिक ग्राहकांच्या 2300 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज गहाण ठेवल्या. कार्व्हीने यातून स्वत:साठी आणि समुहातील कंपन्यांसाठी 8 बँका आणि वित्तीय संस्थांकडून (NBFC) 851.43 कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. या प्रकरणात सेबीसोबत एनएसई आणि बीएसईने जून, 2019 पासून तपास सुरू केला होता. एनएसईने या तपासासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली होती. या प्रकरणी बीएसई आणि एनएसई कडून तपासाचे कार्य सुरू आहे. पण तपासकार्यात वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सेबीने ही दंडात्मक कारवाई केली.
कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड ही कंपनी बीएसई आणि एनएसई यांच्या देखरेखीखाल काम करते. या दोन्ही संस्थांना कार्व्हीच्या गैरव्यवहाराचा छडा लावण्यात उशीर झाल्याने त्यांना या प्रकरणात जबाबदार धरून त्यांच्यावर अनुक्रमे 3 आणि 2 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.
Image source - https://bit.ly/3vvEQyH