Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Fine : सेबीने TBVFL आणि THL कंपन्याना ठोठावला 2.46 कोटींचा दंड

SEBI

Image Source : http://www.en.wikipedia.org/

SEBI Fine : सेबीने Regulatory नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन कंपन्या आणि प्रमोटरसह एकूण सात व्यक्तींना सुमारे 2.46 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर माहिती.

सेबीने regulatory  norms चे उल्लंघन केल्याप्रकरणी, unfair trade practices अवलंबिल्याबद्दल दोन कंपन्या आणि प्रमोटर सह एकूण सात व्यक्तींना सुमारे 2.46 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

TBVFL आणि THL

TBVFL अर्थात ‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड ’ आणि THL अर्थात ‘तळवलकर्स हेल्थ क्लब लिमिटेड’ या संबंधित कंपन्या आहेत. कंपन्यांकडे पुरेसा कॅश बॅलन्स असतांना कंपन्यांनी मुदत कर्जावरील व्याजाची भरपाई केली नाही.

काय आहे प्रकरण

ऑगस्ट -ऑक्टोबर 2019 दरम्यान आलेल्या तक्रारींनुसार कंपन्यांकडे पुरेसा कॅश बॅलन्स असतांना कंपन्यांनी मुदत कर्जावरील व्याजाची भरपाई न केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार  चोकशी सुरु झाल्यानंतर  लक्षात आले कि कंपन्यांकडे 77 कोटी एवढी कॅश असतांना कंपनीने मुदत कर्जावरील व्याज जे केवळ 3.4 कोटी रुपये इतके होते त्याची भरपाई केली नाही. त्यामुळे संशय निर्माण होऊन कंपनी विरुद्ध कारवाईस सुरुवात झाली.

फसवणूक आणि चुकीची व्यापार पद्धती (Unfair trade practices)

दोन्ही कंपन्यांशी संबंधित संबंधितांवर फसवणूक आणि unfair trade practices या संबंधित उल्लंघनासाठी दंड ठोठावण्यात  आला आहे.

या व्यक्तींना ठोठावला दंड

TBVFL च्या गिरीश तळवलकर, प्रशांत तळवलकर अनंत गवांदे आणि हर्षा भटकळ यांवर प्रत्येकी 36 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर THL  च्या विनायक गवांदे,मधुकर तळवलकर यांना प्रत्येकी 24 लाख  व  गिरीश नायक यांच्यावर 18 आणि THL वर 12 लाख एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.

Stock market बंदी

संबंधित सातही व्यक्तींवर 18 महिन्यांसाठी रोखे बाजार (stock market ) बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना कोणत्याही लिस्टेड (सूचीबद्ध )कंपनी किंवा semi registered मध्यस्थ्यांशी संपर्क ठेवता येणार नाही.

मार्केटमधून बॅन (प्रतिबंध)

सेबीने गिरीश तळवलकर, प्रशांत तळवलकर, अनंत गवांदे, हर्षा भटकळ व गिरीश नाईक यांना 18महिन्यांसाठी मार्केटमधून बंदी केली आहे त्यांच्यावरील निर्बंधांची मुदत संपल्यानंतर हे निर्बंध सुरू होतील.