Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Seasonable business : हंगामी व्यवसाय करुन मिळवू शकता भरघोस उत्पन्न; जाणून घ्या कोणते व्यवसाय करू शकता?

Seasonable business

Seasonable business : प्रत्येक वस्तूचे, पदार्थाचा एक हंगाम असतो. त्याच सिजनमध्ये जास्त मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन तुम्हीही व्यवसाय सुरू करू शकता. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील म्हातारे आजी -आजोबा सिजनेबल व्यवसाय चालवून आपला उदरनिर्वाह करतात. जाणून घेऊया, ते कोणकोणते व्यवसाय चालवतात?

Seasonable business : आपल्याला नेहमी असं ऐकायला येतं की, म्हातारपणात जर सुखाने जीवन जगायचे असेल तर तरुणपणातील झोप उडवावी लागते. पण तरुणपणात मेहनत केल्यानंतर म्हातारपण सुखात जाईल असे नेहमी होत नाही. काही लोकांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील म्हातारे आजी -आजोबा. 

हे दोघ वरुड येथील केदार चौक परिसरातील मंदिराजवळ बसून आपला सिजनेबल व्यवसाय चालवतात. गेली 6 वर्ष एकाच ठिकाणी हे आजी आजोबा आपला व्यवसाय करतात. वर्षभरात ते 5 ते 6 प्रकारचे व्यवसाय करतात. जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीनिमित्य सुवासिनी महिला सगळ्यांना वाण देतात. त्यासाठी छोट्या वस्तु उदा. बिंदी पॉकीट, सिंदूरदान, अगरबत्ती घर इत्यादिची विक्री करतात. वर्षभर त्यांचे व्यवसाय बदलतात. जाणून घेऊया ते कोणकोणते व्यवसाय करतात? त्यांची किती कमाई होते? 

हे व्यवसाय करतात? 

  • संक्रांती वाण व्यवसाय 
  • होळीचे रंग व्यवसाय 
  • लिपाफा व्यवसाय 
  • रानभाजी व्यवसाय 
  • बेलपत्र फुलांचा व्यवसाय 
  • गणपती सजावट व्यवसाय 
  • मातीचे दिव्यांचा व्यवसाय 
  • पूजेचे साहित्य (ओटी, नारळ) व्यवसाय 

संक्रांती वाण व्यवसाय 

जानेवारी महिन्याच्या सुरवातीला हा व्यवसाय सुरू केला जातो. अनेक महिला येथून वाण खरेदी करतात. त्याचबरोबर एखाद्या संस्थेचे हळदीकुंकू असल्यास त्यांचा मोठा ऑर्डर मिळतो. यात होणारा नफा हा विक्रीवर आहे, काही वेळा भरपूर नफा मिळतो तर काही वेळा कमी. संस्थेचे ऑर्डर आल्यास नफा हा दुपट्टीने वाढतो. 

होळीचे रंग व्यवसाय 

holi-colour-shop.jpg
www.tv9marathi.com

आता सर्वत्र केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरत असल्याने नागरिक याबाबत जागरूक झाले आहे. नैसर्गिक पदार्थ आणि वस्तूंवर जास्त भर दिला जात आहे. केमिकलयुक्त कलरमुळे डोळे बेकार होणे, स्कीन बेकार होणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यामुळे होळीला नैसर्गिक कलर वापरण्याकडे कल वाढला आहे. यातून चांगले उत्पन्न घेता येऊ शकते. 

लिफाफा व्यवसाय 

उन्हाळा सुरू झाला की लग्न, साखरपुडा आणि विविध कार्यक्रम सुरू होतात. तेव्हा अनेक लोकं गिफ्ट न देता लिफाफामध्ये पैसे टाकून देतात. तो लिफाफा साईज, डिझाईननुसार असतो. त्याच्या किमतीमध्ये सुद्धा फरक असतो. साधा लिफाफा घरी सुद्धा तयार करता येतो, त्यासाठी कागद, गोंद, कैची इत्यादि साहित्य लागते. यातूनही बऱ्यापैकी कमाई केली जाऊ शकते. वस्तु आवडली की ग्राहक किंमतीचा जास्त विचार करत नाहीत.  

रानभाजी व्यवसाय 

ranbhajya-ydyog.jpg
www.naveshahar.com

पावसाळा सुरू झाला की रानभाजी बाजारात येते. प्रत्येक भागात वेगवेगळ्या रानभाजी आहेत. वर्षभरातून एक वेळा मिळत असल्याने आणि पौष्टिक असल्याने ग्राहक मागेल तेवढी किंमत मोजतात. यातून सुद्धा चांगलीन कमाई केली जाऊ शकते. गेल्या 10 वर्षापासून हे म्हातारे आजी आजोबा असे सिजनेबल व्यवसाय करतात. गावतील लोकांचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. 

बेलपत्र फुलांचा व्यवसाय

श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होते. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. भगवान शंकराची पूजा बेलपत्र वाहल्याशिवाय अपूर्ण आहे, असे मानले जाते. शहरी भागात बेलपत्राचे झाड कमीत कमी असल्याने तेथील लोकांना ते विकत घ्यावे लागते. यातून त्यांची पूजा आणि तुमचे इन्कम दोन्ही होते.

गणपती सजावट व्यवसाय 

सप्टेंबर महिन्यामध्ये गौरी-गणपतीचे आगमन होते. गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे साज केले जातात. काही लोकांना हँडमेड वस्तूंची जास्त आवड असते. ते लोकं हा साज खरेदी करतात. या व्यवसायातून सुद्धा भरपूर नफा मिळवता येतो, लोकांना काय हवं ते ओळखल की कोणत्याही व्यवसायात नफा मिळवता येतो.

मातीचे दिव्यांचा व्यवसाय

divyche-udyog.jpg
vasudhalaya.wordpress.com

दिवाळीच्या सिजनमध्ये मार्केटमध्ये अनेक प्रकारचे दिवे आपल्याला बघायला मिळतात. पण, अजूनही काही लोकं आपल्या घरी मातीचेच दिवे लावतात. मातीच्या दिव्यांच्या किमती इतर दिव्यांच्या किमतीपेक्षा कमी असतात. परंपरा मानणारे सर्व लोकं मातीचे 5 दिवे तरी घरी नेतात. या व्यवसायातून सुद्धा चांगली कमाई होऊ शकते. 

पूजेचे साहित्य (ओटी, नारळ) व्यवसाय 

नवरात्री सुरू झाल्यानंतर अनेक सुवासिनी देवीची ओटी भरतात. काही महिला घरूनच ओटीचे साहित्य घेऊन जातात. पण नोकरी करणाऱ्या महिलांना ते शक्य होत नाही त्यामुळे त्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या ओटीने पूजा करतात. ही एक ओटी 51 रुपयांची असते. यातून सुद्धा भरपूर नफा मिळवता येऊ शकतो. आजी- आजोबा करतात त्या व्यवसायाचे स्वरूप अगदी छोटे आहे.

तुम्हीही करू हे व्यवसाय करू शकता. तुम्हालाही यातून भरपूर उत्पन्न मिळू शकते. या व्यवसायाचे स्वरूप तुम्ही छोटे मोठे दोन्ही ठेवू शकता.