Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Animal Husbandry Loan : पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायासाठी कर्ज पाहिजे? एसबीआयची 'ही' योजना आहे फायद्याची

www.zawya.com

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्याकडून पशुधन कर्ज योजनेतून कर्जाचा पुरवठा केला जातो. ही कर्ज योजना सुरू करण्यामागचा बँकेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार तरुणांना शेतीपुरक जोडधंदा सुरू करण्यास प्रोत्साहन देणे आहे. SBI बँक ग्राहकांना पशुधन कर्ज हे केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी राबवण्यात आलेल्या KCC (किसान क्रेडिट कार्ड) योजनेतंर्गत उपलब्ध करून देते.

शेती सोबत अनेक शेतकरी पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्त्य शेती यासारखे इतर लहान जोडधंदे सुरु करण्याचा विचार करतात. यातून चांगले उत्पन्नही मिळते मात्र, अनेकवेळा अशा प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांकडे अथवा बेरोजगार तरुणांकडे भांडवलाचा मोठा प्रश्न उभा राहतो. मात्र, आता भांडवलाच्या अभावाने तुम्हाला थांबवण्याची गरज नाही. शेती पुरक जोड व्यवसया करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून  (SBI) कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. एसबीआय च्या पशुधन कर्ज योजनेची माहिती जाणून घेऊयात.  

पशुधन कर्ज योजनेचे स्वरुप

भारतातील शेतकऱ्यांसाठी पशुपालन हा एक आर्थिकदृष्ट्या फायद्याचा शेतीपुरक जोडधंदा मानला जातो. अशा व्यवसायासाठी  स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्याकडून पशुधन कर्ज योजनेतून कर्जाचा पुरवठा केला जातो. ही कर्ज योजना सुरू करण्यामागचा बँकेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार तरुणांना शेतीपुरक जोडधंदा सुरू करण्यास प्रोत्साहन देणे आहे. SBI बँक ग्राहकांना पशुधन कर्ज हे केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी राबवण्यात आलेल्या KCC (किसान क्रेडिट कार्ड) योजनेतंर्गत उपलब्ध करून देते.

कर्जाचे फायदे काय आहेत?

स्टेट बँक ऑफ इंडियांकडून देणात येणारे पशूधन कर्ज हे किसान क्रेडिट कार्ड योजनेतंर्गत दिले जात असल्याने या कर्जाचा मुख्य फायदा म्हणजे ज्यांना पशुपालन,दुग्धव्यवसाय सुरू करायच आहे. अशा अर्जदारांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जातो. तसेच केवळ पशुपालनच नाही तर शेतकरी या कर्ज योजनेतून दुग्ध व्यवसाय,पोल्ट्री, मेंढी पालन, शेळीपालन, मत्स्यशेतीसाठी या कर्जाचा वापर करू शकतो.

कर्जाची मर्यादा, व्याज

SBI पशुधन कर्ज योजनेतून केसीसी योजनेप्रमाणे किमान 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेतून शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला 2% पर्यंत व्याज सवलत मिळते. जर त्यांनी देय तारखेपूर्वीच कर्जाची परतफेड केली, तर शेतकऱ्यास 1% अतिरिक्त सवलत दिली जाते. बँक कर्जाच्या रकमेवर एक वर्षासाठी 7% व्याज आकारते. व्याजाची सवलत ग्राह्य धरल्यास कर्जदारास केवळ 4% व्याज भरावे लागेल.

काय आहे अर्जाची प्रक्रिया

जर तुम्हाला पशुपालन अथवा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या एसबीआय शाखेत जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पशुधन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करायचा आहे.  तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला कर्ज मंजुर केले जाईल. या कर्जासाठी अर्जदार  पशुधन उद्योगाशी निगडीत असावा क्रेडिट स्कोअर योग्य असणे गरजेचे आहे. कागदपत्रामध्ये पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधारकार्ड, पॅन कार्ड, यासह बँकेच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.