तुम्ही हेल्थ प्लॅन घ्यायचा विचार करत असल्यास SBI जनरल इन्शुरन्सने लाॅंच केलेला सुपर हेल्थ इन्शुरन्स प्रोडक्ट घेण्याचा विचार करु शकता. कारण, कंपनीने ही सर्वसमावेशक हेल्थ पॉलिसी (comprehensive health policy) लाॅंच केली असून याची घोषणा कंपनीने 11 सप्टेंबर 2023 ला केली आहे. यात तुम्हाला अनेक कव्हरेजचा लाभ घेता येणार आहे.
4 प्लॅन आहेत उपलब्ध
मुख्यता यात तुम्हाला 27 स्टॅंडर्ड कव्हरेज आणि 7 पर्यायी कव्हरेजचा लाभ घेता येणार आहे. या प्रोडक्ट अंतर्गत तुम्ही 4 प्लॅन घेऊ शकणार आहात. ज्यात तुम्हाला इलाईट, प्लॅटिनम, प्रीमियर आणि प्लॅटिनम इनफानाईटचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपयांपासून 2 कोटीपर्यंत इन्शुरन्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, पाॅलिसीचा अवधी एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंत निवडता येणार आहे. या पाॅलिसीचा लाभ सर्वच स्तरातील व्यक्तीना घेता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
या फिचर्सचा घेता येणार लाभ
या पाॅलिसीत तुम्हाला रिइन्शुरन्स बेनफिटचा लाभ घेता येणार आहे. तसेच यादीतील दूर्धर आजाराचे निदान भारतात झाल्यास उपचारासाठी परदेशात मेडिकल उपचार करता येणे शक्य आहे. याशिवाय प्लॅनमध्ये डे केअर ट्रीटमेंट, रोड अॅम्ब्युलन्स आणि एअर अॅम्ब्युलन्सचा ही समावेश करण्यात आला आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये पॉलिसी धारकांना डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन, पेशंट हॉस्पिटलायझेशन आणि प्री-पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा कव्हरेज देण्यात आला आहे. विषेश म्हणजे SBI सुपर हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये मॅटर्निटीसह बालकांच्या लसीकरणाबरोबरच नवजात बालकांचा खर्चही उचलण्यात येणार आहे.
तसेच, पॉलिसी धारकाला ओपीडी कव्हर, होम हेल्थ कव्हर आणि बॅरिअॅट्रिक सर्जरी कव्हरचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. याशिवाय या पाॅलिसीद्वारे पहिल्या दिवसापासून वार्षिक हेल्थ चेकअप, एनहान्स्ड कम्युलेटीव्ह बोनस (Enhanced Cumulative Bonus), रिकव्हरी बेनिफिट आणि कॅश बेनिफिटही या पाॅलिसीत सामील आहे. याबरोबर तुम्हाला वेलनेस बेनिफिट्स अंतर्गत प्लॅनमध्ये अनलिमिटेड जिम मेंबरशिप, वॉक हेल्दी बेनिफिट देखील दिला जातो.
त्यामुळे तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स घ्यायच्या तयारीत असल्यास, SBI जनरल इन्शुरन्सचे 'सुपर हेल्थ इन्शुरन्स' हे प्रोडक्ट निवडू शकता. कारण, यामध्ये बऱ्याच महत्वाच्या गोष्टी कंपनीने कव्हर केल्या आहेत. पण, पाॅलिसी घेण्याआधी एकदा कंपनीची वेबसाईट नजरे खालून घालणे आवश्यक आहे.