Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Home Loan: गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी खूशखबर, प्रोसेसिंग फीबाबत एसबीआयने घेतला मोठा निर्णय, ग्राहकांना होणार फायदा

Home Loan

SBI Home Loan: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने गृह कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. ही सवलत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने गृहकर्जावरील प्रोसेसिंग फीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने गृह कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. ही सवलत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

एसबीआयने गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्कात 50% ते 100% सवलत देण्याची घोषणा केली आहे. गृह कर्ज, फ्लेक्झीपे, एनआरआय, नॉन सॅलरीड, प्रिव्हीलेज अशा गटातील ग्राहकांना 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होमलोन घेतल्यास त्यावर प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येईल, असे बँकेने म्हटले आहे.

बँकेच्या होमलोनविषयक वेबसाईटनुसार सर्व प्रकारची गृह कर्ज, टॉपअपवर 50% सवलत दिली जाणार आहे. गृह कर्जावर किमान 2000 रुपये ते 5000 अधिक जीएसटी असे प्रक्रिया शुल्क लागू होते. मात्र या सवलत योजनेने ग्राहकांची बचत होणार आहे.

रिसेल, रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीजच्या खरेदीसाठी ग्राहकांचा सिबिल स्कोअर 700 वर असेल तर त्याला अतिरिक्त 0.20% सवलत मिळणार आहे. याशिवाय थेट बिल्डरसोबत सामंजस्य करार असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात ग्राहकांना अतिरिक्त 0.05% सवलत दिली जाणार आहे.  

सध्या प्रोसेसिंग फी किती?

बँकेकडून सर्वसाधारणपणे कर्जाच्या एकूण रकमेच्या 0.35% रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारली जाते. यात किमान 2000 रुपये ते जास्तीत जास्त 10000 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क ग्राहकाला भरावे लागते. 

सिबिल स्कोअरनुसार ठरतो गृह कर्जाचा दर 

ग्राहकाच्या सिबिल स्कोअरनुसार बँकांकडून होम लोनचा दर ठरवला जातो. 750 ते 800 या दरम्यान सिबिल स्कोअर असल्यास त्या ग्राहकाला गृह कर्जाचा दर 9.15% इतका आहे. ज्यात 0.45% सवलत मिळाल्यास गृहकर्जाचा दर 8.70% इतका कमी होतो. सिबिल स्कोअर 700 ते 749 या दरम्यान असल्यास त्या ग्राहकाला 8.80% गृह कर्ज मिळेल. सिबिल स्कोअर 650 ते 699 या दरम्यान असलेल्या ग्राहकांना 9.45% इतक्या दराने गृहकर्ज मिळेल.