Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBFC Finance Listing: एसबीएफसी फायनान्सच्या शेअरची धमाकेदार एंट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची बंपर कमाई

SBFC Finance Listing

Image Source : www.nseindia.com

SBFC Finance Listing: आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. बाजारात नकारात्मक वातावरण असल्याने गुंतवणूकदार आणि शेअर बाजार विश्लेषकांचे एसबीएफसीच्या शेअर लिस्टींगकडे लक्ष लागले होते. दोन्ही शेअर मार्केटमध्ये घसरण सुरु असताना 'एसबीएफसी'चा शेअर तेजीसह सूचिबद्ध झाला.

एसबीएफसी फायनान्स (SBFC Finance List at robust Premium) या कंपनीने आज बुधवारी 16 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात धमाकेदार एंट्री घेतली. एसबीएफसी फायनान्सचा शेअर 82 रुपयांवर लिस्ट झाला. पहिल्याच दिवशी आयपीओतून गुंतवणूकदारांनी 44% फायदा कमावला.

एसबीएफसी फायनान्स कंपनीने समभाग विक्रीतून 1025 कोटींचा भांडवल उभारले. यात 600 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 425 कोटींची ऑफर फॉर सेल होती. कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 54 ते 57 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता.

आयपीओ योजनेला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. आयपीओ 192 पटीने सबस्क्राईब झाला होता. यात बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 49 पटीने आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव हिस्सा 11 पटीने सबस्क्राईब झाला. त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये एसबीएफसी फायनान्स कंपनीचा शेअर 26 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत होता.

आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. बाजारात नकारात्मक वातावरण असल्याने गुंतवणूकदार आणि शेअर बाजार विश्लेषकांचे एसबीएफसीच्या शेअर लिस्टींगकडे लक्ष लागले होते. दोन्ही शेअर मार्केटमध्ये  घसरण सुरु असताना 'एसबीएफसी'चा शेअर तेजीसह सूचिबद्ध झाला. पॉझिटिव्ह लिस्टींगनंतर कंपनीच्या संचालकांनी आणि व्यवस्थापनातील अधिकारी वर्गाने एकच जल्लोष केला.

एसबीएफसी फायनान्सचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात 82 रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये कंपनीने प्रति शेअर 57 रुपयांचा दर निश्चित केला होता. प्रत्यक्षात एसबीएफसी फायनान्सने 82 रुपयांसह शेअर मार्केटमध्ये पदार्पण केले. मुंबई शेअर बाजारात एसबीएफसीचा शेअर 81.99 रुपयांवर लिस्ट झाला.

बुधवारी दुपारी 3.25 मिनिटांनी एसबीएफसी फायनान्सचा शेअर 61.14% तेजीसह 91.85 रुपयांवर ट्रेड करत होता. आयपीओत शेअर प्राप्त झालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांनी आज जबरदस्त कमाई केली.

मार्चअखेर कंपनीला 149 कोटींचा नफा

एसबीएफसी फायनान्स ही कंपनी ठेवी न स्वीकारणारी मात्र कर्ज वितरणातील बिगर बॅंकिंग वित्तसंस्था आहे. 31 मार्च 2023 अखेर एसबीएफसी फायनान्स कंपनीला 149.7 कोटींचा नफा मिळाला. कंपनीचा महसूल 740 कोटी रुपये इतका होता.