Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Satish Kaushik: अभिनयासाठी नोकरी धुडकावणारा कलाकार!

Satish Kaushik

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात नाहीयेत. त्यांच्या अभिनयाचे करोडो चाहते जगभर आहेत. त्यांच्या दिसण्यावरून ते कधी अभिनेते बनतील असं त्यांच्या घरच्यांनाही वाटलं नव्हतं. परंतु जन्मतः प्रतिभावान असलेल्या सतीश कौशिक यांची प्रतिभा दिवसेंदिवस उजळून निघाली. सतीश कौशिक यांचा प्रवास या लेखात आपण जाणून घेऊयात.

Satish Kaushik News: स्व. सतीश कौशिक यांचा दिल्ली ते मुंबई हा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक अडीअडचणींचा सामना करत त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी दिल्ली येथे झाला. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील धनुदा हे त्यांचं मूळ गाव. वडील नोकरीनिमित्त दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीतील करोल बाग परिसरात त्यांचं बालपण गेलं.

लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. वडील 'हरिसन' या कुलूप बनवणाऱ्या कंपनीत सेल्समन म्हणून कामाला होते.  महिना 300 रुपये त्यांना पगार मिळायचा. तुटपुंज्या पगारात आपल्या मुलांना त्यांनी शिकवलं. 

आई-वडिलांनी आम्हा 3 भावंडाना चांगले संस्कार दिले असे ते म्हणत. मोठ्यांशी बोलताना आवाजाचा टोन काय असावा, देहबोली कशी असावी हे सगळे आम्हाला घरातूनच शिकवलं गेलं असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

satish-kaushik-1.jpg
Source: www.prabhatkhabar.com

सातवी-आठवीत असताना त्यांना सिनेमा बघण्याची चटक लागली! एकदा आईच्या उशीखालून त्यांनी 5 रुपये चोरले आणि 'गाईड' सिनेमा बघायला गेले. सिनेमा बघून घरी येऊपर्यंत पैसे चोरीला गेले असं आईला कळून चुकलं होतं. कुठूनतरी आईला खबर मिळाली आणि सतीश यांची यथेच्छ धुलाई झाली. मार खाऊन देखील सिनेमाचं वेड कमी झालं नाही असं सतीश सांगत. 

पुढे दिल्लीच्या नामांकित किरोडमल कॉलेजमध्ये सतीश यांनी प्रवेश घेतला. हे कॉलेज खास थिएटर ग्रुपसाठी ओळखलं जायचं. इथे खऱ्या अर्थाने त्यांचे अभिनय कौशल्य फुलले. इथे त्यांना प्रा. फ्रॅंक ठाकुरदास भेटले. त्यांच्या या प्राध्यापकांनी सतीश यांच्यातले गुण ओळखले होते. कॉलेज झाल्यावर कुठल्याही नोकरी धंद्यात न अडकता अभिनय क्षेत्रातच काम करावं असं प्रा. ठाकुरदास यांनी सतीश यांना सुचवलं.

सतीश मात्र अजूनही न्यूनगंड बाळगून होते. मी दिसायला देखणा नाही, गोरा नाही, त्यामुळे मला कोण काम देणार हा सवाल त्यांनी केला. यावर प्रा. ठाकुरदास म्हणाले,"कुठलाही कलाकार हा त्याच्या रूपाने मोठा होत नसतो तर कालागुणांनी मोठा होत असतो, तू जेव्हा अभिनयाला उभा राहतोस तेव्हा सगळ्यांना पुरून उरतोस." 

या शब्दांनी सतीश यांना आत्मबळ दिलं आणि अभिनयात करियर करण्याचा त्यांनी निश्चय केला. 

satish-kaushik2.jpg
Source: www.outlookindia.com

NSD आणि FTII  चा प्रवास

दिल्लीतील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा (NSD) म्हणजे अभिनयाची पंढरी! इथे प्रवेश घेण्यासाठी लोक आकाशपाताळ एक करतात. इथे आपल्याला प्रवेश मिळावा असं सतीश यांना मनोमन वाटत होतं. 

याचवर्षी बहाद्दरगड येथे त्यांना नोकरी लागली होती.त्यावेळी पोस्टाने नियुक्तीपत्र येत असत. जेव्हा पोस्टमन नियुक्तीपत्र घेऊन घरी आला तेव्हा बाहेरच्या बाहेर सतीश यांनी ते पत्र घेतलं आणि फाडून फेकून दिलं, कारण त्यांना NSD मध्ये प्रवेश घ्यायचा होता.

मोठ्या भावाच्या मदतीने त्यांना बॉल बेयरिंग बनवणाऱ्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पण, इथे देखील त्यांचं मन रमले नाही. 

1975 मध्ये NSD मध्ये प्रवेश घेण्याचा जेव्हा त्यांनी निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या भावंडांनी त्यांची टिंगल केली. तुला हे जमणार नाही असंही म्हटलं. परंतु वडिलांनी मात्र त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांची गुणवत्ता बघून त्यांना प्रवेश मिळाला. इथे त्यांनी अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी पुण्यातील FTII मधून दिग्दर्शनाचे धडे घेतले.

मुंबईत टेक्स्टाईल कंपनीत नोकरी!

NSD आणि FTII मधून शिकून आल्यानंतर लगेचच सिनेमा क्षेत्रात काम मिळेल असं कौशिक यांना वाटलं होतं. परंतु तसं काहीही घडलं नाही. सतीश यांनी मुंबईला जाऊन नशीब आजमावून बघण्याचा निर्णय घेतला. हे साल होतं 1979. मुंबईत त्यांच्या फारशा ओळखी-पाळखी नव्हत्या. 

मुंबईत गेल्यागेल्या काम मिळणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. सिनेमात काम मिळण्याआधी पोटासाठी काही तरी कमवावं लागेल हे त्यांना ठाऊक होतं. प्रीमिअर टेक्स्टाईल कंपनीचे मालक बनारसीलाल अरोरा हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्या विक्रोळीतल्या कंपनीत सतीश यांना काम मिळालं. 

पहिल्याच दिवशी त्यांना कंपनीत साफसफाईचं काम सोपवलं गेलं. NSD आणि FTII सारख्या नामांकित संस्थांमधून प्रशिक्षण घेऊन आलेला हा कलाकार साफसफाई करताना रडत होता. परंतु कष्टाशिवाय पुढचे मार्ग खुले होणार नाहीत हे त्यांना माहिती होतं. 

satish-kaushik-3.jpg
Source: www.english.jagran.com

त्यावेळी मुंबईत पृथ्वी थिएटर सुरू झालं होतं. नाटक कलाकार मंडळी पृथ्वी थिएटरवर जमायची. चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील कलाकारांशी इथे त्यांच्या ओळखी वाढत गेल्या. दुपारी काम आणि संध्याकाळी नाटक असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. 

1981 साली 'चक्र' चित्रपटात त्यांना स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अभिनयाला लोकांनी दाद द्यायला सुरुवात केली. 

मुंबई शहराने ओळख दिली

मुंबई शहर कुणालाही रिकाम्या पोटी झोपू देत नाही असं सतीश कायम म्हणायचे. या शहराने काम दिलं, ओळख दिली असं ते म्हणत. सांताक्रूझ येथे एके ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून ते राहत होते. शेखर कपूर यांच्या 'मासुम' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांना 500 रुपयांची नोकरी मिळाली. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. 

पुढे जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह,अनिल कपूर, अनुपम खेर अशी जिवाभावाची मंडळी त्यांना भेटली. सतीश कौशिक यांचा अभिनय आता लोकांना आवडू लागला होता.लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

35 वर्षांचे करियर 

आपल्या आयुष्यात सतीश कौशिक यांनी अनेकविध भूमिका केल्या. चित्रपट, नाटक, ओटीटी अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर त्यांचा सहज वावर होता. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना त्यांनी आपलंसं केलं होतं. 'सुपरस्टार बायो' च्या रिपोर्टनुसार सतीश कौशिक आणि त्यांच्या कुटुंबियांची 15 मिलियन डॉलर किंमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 

'राम लखन' आणि 'साजन चले ससुराल' या चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट कॉमेडियन चा फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता.