देशातील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक सॅमसंगने गॅलक्सी A54 या 5G फोनवर तब्बल 25 हजार 500 रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. गॅलक्सी A54 5G या फोनची मूळ किंमत 40 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र एक्सचेंज आणि इतर ऑफर्समधून हा फोन 15 हजार 500 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
स्वातंत्र्य दिनापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ऑफर्स सुरु आहे. अनेक कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर्सची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे.
सॅमसंगने नुकताच लॉंच केलेल्या झेड फोल्ड 5 आणि झेड फ्लिप 5 या दोन्ही स्मार्टफोनवर 18000 रुपयांपर्यंत सवलत देण्याची घोषणा केली आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर ग्राहकांना थेट मोबाईल खरेदी करता येईल.
सॅमसंगच्या वेबसाईटनुसार गॅलक्सी A54 5G या 8 जीबी मेमरी आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची मूळ किंमत 40 हजार 999 रुपये इतकी आहे. यावर 11% डिस्काउंट देण्यात आला आहे. त्याशिवाय 3000 रुपयांचा बँक डिस्काउंट देखील ग्राहकांना मिळणार आहे. गॅलक्सी A54 5Gफोन वॉटर प्रुफ असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
याशिवाय गॅलक्सी A54 5G या फोनवर इतर ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत. एक्सचेंज बोनस धरता एकूण 22 हजार 500 रुपयांची सवलत मिळणार आहे. एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना कार्डने पेमेंट केल्यास 3000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. एक्सचेंज बोनस, कॅशबॅक, कार्ड डिस्काउंट धरता गॅलक्सी A54 5G वर खरेदीदारांना एकूण 25 हजार 500 रुपयांची सवलत मिळणार आहे.
गॅलक्सी A54 5G ची वैशिष्ट्ये
- गॅलक्सी A54 5G हा सध्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह उपलब्ध आहे.
- 128 जीबी इंटरनल स्टोरेजचे मॉडेल सध्या उपलब्ध नाही.
- गॅलक्सी A54 5G मोबाईलमध्ये 1 टीबीपर्यंत एसडी कार्ड सपोर्ट करते.
- यात पॉवरफूल ऑक्टोकोअर प्रोसेसर असून 1080*2340 रिझ्युलोशनचा 6.4 इंचाचा एचडी आणि सुपर अॅमोलॉइड डिस्प्ले आहे.
- या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे असून प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल इतका आहे.
- याशिवाय 12 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
- गॅलक्सी A54 5G मोबाईलमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे.
- पूर्ण चार्जिंगनंतर स्मार्टफोन 21 तास व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते, असा दावा कंपनीने केला आहे.