भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या G20 शिखर परिषदेत भारत, मध्य पूर्व आणि युरोप (इंडिया मिडल ईस्ट युरोप इकोनॉमिक कॉरिडॉर)ची घोषणा करण्यात आली. या मेगा इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वेच्या IRCON इंटरनॅशनल, रेल्वे विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Ltd) आणि आयआरएफसी (IRFC) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी शेअर बाजार सुरू होताच तेजी दिसून आली.
मिडल इस्ट युरोप इकोनॉमिक कॉरिडॉर
G-20 परिषदे दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी संयुक्तपणे मिडल इस्ट युरोप इकोनॉमिक कॉरिडॉर या प्रकल्पाची घोषणा केली. या कॉरिडॉर अंतर्गत इटली, फ्रान्स, जर्मनी, UAE, सौदी अरेबिया या मध्य पूर्व देशांना रेल्वे मार्गाने जोडण्याचा आणि जल वाहतूक मार्गाने भारताला आखाती राष्ट्राशी जोडणे हा उद्देश आहे. यासाठी रेल्वे,सागरी आणि रस्ते वाहतूक मार्गांचा समावेश असणार आहे. दरम्यान, केवळ या घोषणेनंतर सोमवारी रेल्वेच्या IRCON इंटरनॅशनल, रेल्वे विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Ltd) आणि आयआरएफसी (IRFC) या कंपन्यांच्या शेअर्सनी उसळी घेतली आहे.
रेल्वे निगम आणि इरकॉन इंटरनॅशनलचे शेअर तेजीत
सोमवारी मार्केट सुरु झाल्यानंतर रेल्वे विकास निगम लिमिटेड या कंपनीचे शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. मार्केट सुरु झाल्यानंतर काही वेळातच RVNL चा शेअर 22.85 रुपयांनी वाढून 185.70 रुपयांवर पोहोचला आहे. बाजाराच्या सकाळच्या सत्रात 14.03% शेअर वधारला होता. तसेच रेल्वेच्या Ircon International च्या शेअरच्या किमतीमंध्ये तब्बल 23.80 रुपयांची म्हणजे 17.81% वाढ झाल्याने शेअर 157.45 व्यवहार करत होता. त्याच प्रमाणे रेल्वेची Indian Railway Finance Corp Ltd या कंपनीच्या शेअरमध्ये देखील आज 9.99% वाढ झाल्याने शेअरच्या किमतीत 7.70 रुपयांची भर पडून तो 84.80 व्यवहार करत होता. सकाळच्या सत्रानंतर यामध्ये आणखी काही बदल दिसून येतील.