Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RR Kabel IPO: RR केबलची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, IPO च्या किमतीपेक्षा 14 टक्क्यांनी झाला लिस्ट, वाचा सविस्तर

RR Kabel

Image Source : www.rrkabel.com

शेअर मार्केटध्ये RR Kabel च्या लिस्टींगसाठी बरेच गुंतवणुकदार वाट पाहून होते. आज सकाळी 10 वाजता कंपनीचा शेअर एनएसई (NSE) आणि बीएसईवर(BSE) धडकला आणि गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा दिला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अजून कितीचा आकडा हा शेअर गाठणार आहे. याकडे सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष लागून आहे.

इलेक्ट्रीक मार्केटमध्ये दबदबा असलेल्या आरआर केबलचा शेअर आज शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला. कंपनी मुख्यता केबल आणि वायरच्या बिझनसेशी संबंधित आहे. कंपनीने पहिल्यांदाच मार्केटमध्ये कंपनीचा IPO आणला. त्यामुळे गुंतवणुकदारांचे सर्व लक्ष लिस्टींगवर होते. 

मात्र, कंपनीने गुंतवणुकदारांना नाराज केले नाही. कंपनीने मार्केटमध्ये एंट्री करताच गुंतवणुकदारांना 14 टक्के नफा कमवून दिला आहे. त्यामुळे हा आकडा अजून कितीचा टप्पा गाठणार आहे. याकडे सर्व गुंतवणुकदारांचे लक्ष लागून आहे.

गुंतवणुकदारांना प्रति शेअर 144 रुपयांचा नफा

आरआर केबलचा इश्यु प्राईज 1,035 रुपये प्रति शेअर फिक्स केला होता. तो आज NSE वर 1180 आणि BSE वर 1,179 वर लिस्ट झाला. म्हणजे कंपनीने लिस्ट होताच गुंतवणुकदारांना प्रति शेअरवर 144 रुपयांचा नफा दिला. मार्केटमधील तज्ज्ञांनी आधीच 10 ते 15 टक्के प्रीमियवर शेअरच्या लिस्ट होण्याचा अंदाज लावला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी शेअरने मालामाल केले आहे.

IPO ची साईज 1964 कोटी 

RR Kabel ने IPO विक्रीसाठी 13 सप्टेंबरला खुला केला होता. तर त्याची विक्री 15 सप्टेंबरला बंद केली. तसेच, कंपनीच्या शेअरची किंमत 1035 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती. याशिवाय कंपनीच्या IPO ची साईज 1964 कोटी ठेवण्यात आली होती. 

तसेच, याद्वारे गुंतवणुकदारांना  14 शेअर दिले होते. ज्यासाठी गुंतवणुकदारांनी 14,490 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक होते. या IPO ला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे शेवटच्या दिवशी सब्सक्रिप्शन 18.69 पट झाले होते. तसेच, यामध्ये किरकोळ(रिटेल) भाग सर्वात कमी म्हणजे 2.13 पट सबस्क्राईब झाला होता.

तज्ज्ञांनी दिला स्टाॅप लाॅसचा पर्याय

स्वस्तीका इनव्हेस्टमार्टच्या अनुभूती मिश्रा यांनी सांगितले आहे की, कंपनीचे मार्केटमध्ये दर्जेदार प्रोडक्ट आणि चांगले नाव आहे. ती आज मार्केटमध्ये उतरली आहे. तसेच, 1035 रुपयांच्या IPO च्या  किमतीपेक्षा 14 टक्के अधिक म्हणजे 1180 रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला आणि टी +3 सायकल अंतर्गत लिस्ट होणारा हा पहिला आयपीओ ठरला. 

याशिवाय उच्च मूल्यांकन आणि बहुतेक इश्यू ऑफर फॉर सेल असूनही, IPO ला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आणि 18.69 पट सब्सक्रिप्शन मिळाले. या शेअरमध्ये आज चांगली लिस्टिंग पाहायला मिळाली. आता गुंतवणूकदारांना आमची सूचना आहे की, लिस्टिंग गेन बुक केल्यानंतर पोझिशनमधून बाहेर पडा, मात्र ज्यांना शेअर ठेवायचे आहे त्यांनी 1065  वर स्टॉप लॉस लावायला हरकत नाही.

कंपनीविषयी थोडक्यात

कंपनीची सुरुवात 1995 साली करण्यात आली होती. आधी कंपनीचे नाव राम रत्ना अ‍ॅग्रो-प्लास्ट लिमिटेड होते. नंतर ते बदलून 2000 मध्ये RR Kabel करण्यात आले. भारताच्या टाॅपच्या  इलेक्ट्रिक कंपनीत RR Kabel चा नंबर लागतो, जे वायर आणि केबलच्या सेगमेंटमध्ये येते. 

तसेच, कंपनी केबल आणि वायर मार्केटमध्ये  5 टक्के मार्केट शेअरसह 5 वी मोठी कंपनी आहे. याशिवाय कंपनीचे 74 टक्के इन्कम B2C मार्केटमधून येते. त्यामुळे मार्केटमध्ये कंपनीचा बऱ्यापैकी दबदबा आहे. तसेच, शेअर सामान्य सेशनमध्ये म्हणजेच, 3 वाजता 1203.40 वर ट्रेड करत होता.