Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Subsidy on rooftop solar : घरावर सोलर पॅनल बसवा; मोफत विजेसोबत 40% अनुदान मिळवा

Solar Power

Image Source : www.constructionworld.in

केंद्र आणि राज्य सरकारने अपारंपरिक उर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत केंद्र उर्जा विभाग आणि राज्य सरकारचा उर्जा विभाग महाडिस्कॉमच्या ( Mahadiscom) माध्यामातून सौर उर्जा (Solar Power) निर्मितीसाठी घरावर सोलर पॅनल बसवण्याची अनुदानात्मक योजना (Subsidy on rooftop solar scheme ) सुरु केली आहे. नेमकी काय आहे ही योजना? याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

देशात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या प्रमाणात वीज पुरवठा होताना दिसत नाही. विजेच्या तुटवड्यामुळे काही भागात वीज भारनियमन केले जात आहे. त्यातच विजेच्या दरानेही ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान विजेची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारने अपारंपरिक उर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या (Mahadiscom) माध्यामातून सौर उर्जा (Solar Power) निर्मितीसाठी घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी योजना (Rooftop Solar Programme) सुरु करण्यात आली आहे. नेमकी काय आहे ही योजना? यातून कशा पद्धतीने ग्राहकांना आर्थिक फायदा होईल? या योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करायचा याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे ही योजना?

सौर उर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी आणि याचा वापर वाढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून रुफटॉप सोलार योजना (Rooftop Solar Scheme) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जे ग्राहक निवासी घरावर, गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीवर सोलार पॅनल स्थापित करून वीज निर्मिती करू शकतात.त्यासाठी Rooftop Solar Scheme च्या माध्यमातून ग्राहकाला  40टक्के अनुदान दिले जाते. उदाहरणार्थ जर तुम्ही घराच्या छतावर 2 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले. त्यासाठी तुम्हाला 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च येतो. त्यातील 40 टक्के खर्च म्हणजे सरकारकडून 48 हजार रुपये सबसिडीच्या स्वरुपात तुम्हाला परत मिळतो.  केवळ 72 हजार रुपयांमध्ये तुम्ही सौरउर्जा निर्मिती करून वापरू शकता. यामाध्यमातून तुम्हाला सुमारे पुढील 25 वर्ष अक्षय्य उर्जेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला राज्य सरकारच्या वीजवितरण विभागाकडे (महाडिस्कॉम (Mahadiscom) अर्ज करावा लागेल.

काय आहेत योजनेचे नियम?

महाडिस्कॉम (Mahadiscom) यांनी दिलेल्या माहितीनुसार या सोलार उर्जा निर्मिती अनुदान योजनेसाठी काही निकष आणि नियम निश्चित करण्यात आले आहेत.

  • 3 kwp पर्यंत क्षमतेसाठी 40% अनुदान मिळेल.
  • 3kwp ते 10 Kwp क्षमतेच्या सोलार पॅनलसाठी 20% अनुदान मिळेल
  • 10Kwp पेक्षा जास्त सोलार पॅनलसाठी सबसिडी मिळणार नाही
  • या योजनेअंतर्गत सोलार पॅनल बसवण्यासाठी Mahadiscom च्या ठेकेदाराची निवड करावी लागेल
  • यासाठी ‘Mahadiscom अर्ज करावा, त्यानंतर नॅशनल पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक
  • अर्जाच्या वेळी ग्राहकाकडे कोणतीही थकबाकी किंवा थकबाकी नसावी.

ग्राहकांना होईल फायदा

सौर उर्जेमुळे ग्राहकांना भारनियमानाच्या त्रासातून सुटका होणार आहे. तसेच ग्राहकाला 2 किलोवॅटच्या सोलर पॅनलपासून तासाला एक युनिट वीज उपलब्ध होणार आहे. सुर्य प्रकाशाच्या कालावधीत म्हणजे साधारणत: दिवसाला 10 युनिट वीजनिर्मिती होते. त्यानुसार महिन्याला 300 युनिट वीज मोफत उपलब्ध होणार आहे. याशिवाय तुमच्या विजेचा वापर कमी असल्यास तुम्हाला विजेची विक्री देखील करता येऊ शकते. अतिरिक्त वीज विकण्यासाठी तुम्हाला महवितरण अथवा‘आरएडीए’शी (RADA) कडे अर्ज करावा लागतो.


कसा करावा अर्ज?

  • सर्वप्रथम Mahadiscom च्या ऑफिशियल संकेतस्थळावर www.mahadiscom.in भेट द्या.
  • त्यानंतर तुम्ही Consumer Portal वर जा
  • तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाकून स्वत:चा मोबाईल नंबर टाका
  • या पेजवर तुम्ही Renewable Energy Portal वर जा
  • या ठिकाणी तुम्हाला Solar Rooftop या योजनेवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर  RE Rooftop Apply यावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला दोन स्टेप मधील फॉर्म भरायचा आहे
  • पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे
  • दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पेमेंट करायचे आहे
  • या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये शुल्क भरावे लागेल

अर्ज केल्यानंतर तुम्हाला MAHADISCOM च्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल. मंजुरीनंतर नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवून घ्या. सोलर बसवल्यानंतर त्याचे डिटेल्स सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा. DISCOM द्वारे नेट मीटर लावल्यानंतर तपासणी होऊन ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील. त्यानंतर बँक खात्याचे डिटेल्स आणि कॅन्सल चेक सबमिट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला  पुढील 45 दिवसांत तुमचे अनुदान मिळते.