अक्षय उर्जा निर्मिती आणि त्याचा अनिवार्य वापरही काळाची गरज बनली आहे. सध्य स्थितीत देशात विजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सध्या भारतातील वीज निर्मिती ही थर्मल, न्यूक्लियर आणि हायड्रो पॉवरच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामध्ये अपारंपरिक निर्मित विजेचा वाटा 25 टक्के इतकाच आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी नवनवीन योजनाही राबवल्या जात आहे. तसेच सौर उर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही रिन्यू पॉवर(Renew-power)या कंपनीने महाराष्ट्रात सौर उर्जा (Solar Energy) निर्मितीस पुरक अशा उद्योगाच्या माध्यमाधून 18 हजार कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली आहे.
Table of contents [Show]
एकूण 20000 कोटींची गुंतवणूक होणार
रिन्यू पॉवर (ReNew Power) ही ग्लोबल रिन्युएबल एनर्जी कंपनी नागपुरात 10GW मेटलर्जिकल ग्रेड सिलिकॉन (MG Si), 10GW पॉलिसिलिकॉन आणि 6GW इनगॉट-वेफर याच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने 2.2अब्ज डॉलर (₹18,000 कोटी) ची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. हा प्रकल्प 500 एकर जागेवर उभारला जाणार आहे. तसेच प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित पूरक उद्योगांच्या माध्यमातून 2000 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होण्याची शक्यता देखील यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे.
8000 रोजगार निर्मिती-
या गुंतवणुकीसंदर्भात उर्जा खात्याचे प्रमुख म्हणून फडणवीस म्हणाले की, रिन्यू पॉवरची ही गुंतवणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. कारण या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात विशेषत: सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अत्यंत अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया येत आहे. तसेच या प्रकल्पामुळे 8000 हून अधिक थेट नोकऱ्या निर्माण होणार आहेत. 23 जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे रिन्यू पॉवरच्या अधिकार्यांनी या प्रकल्पाबाबत 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट'वर स्वाक्षरी केल्यानंतर फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. तसेच, कंपनी भविष्यासाठी अत्याधुनिक उत्पादने विकसित करण्यासाठी अत्याधुनिक R&D विभागदेखील सुरू करणार असल्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर विदर्भात नवीन बदल घडवून आणेल. विदर्भातील हा प्रकल्प देशाच्या सौर उर्जा क्षेत्राचा कणा बनेल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
सौर उर्जा निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील-
अक्षय उर्जा निर्मितीच्या स्त्रोतामध्ये महाराष्ट्रात सौरउर्जा निर्मितीची मोठी क्षमता आहे. राज्यात जवळपास 250-300 दिवस स्वच्छ सूर्य प्रकाश उपलब्ध असतो. त्यामाध्यमातून सौर फोटोव्होल्टेइक प्रणालीद्वारे 1.5 दशलक्ष युनिट्स प्रतिवर्षी आणि सोलर थर्मल सिस्टमद्वारे 2.5 दशलक्ष युनिट्स प्रतिवर्षी वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे. या प्रचंड स्त्रोताला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आधीच प्रक्रियेत आहे. त्यासाठी इच्छुक सौर प्रकल्प निर्मिती कंपन्याकंडून प्रस्तावही मागवले जात आहेत. त्या अंतर्गत रिन्यू पॉवर कंपनीने देखील सौर उर्जा निर्मितीसाठी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य करारावर (Expression of Interest-EOI)स्वाक्षरी केली आहे.
भारतातील विजेची मागणी आणि पुरवठा-
भारतात पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. तसेच अक्षय स्रोतापासून म्हणजे पवन, सौर, आणि बायोमास इत्यादीपासून देखील वीज निर्मिती होत आहे. सध्य स्थितीत भारतातील सर्वात जास्त वीज उत्पादन कोळशाच्या सहाय्याने औष्णिक उर्जा प्रकल्पाद्वारे केले जाते. ही वीज निर्मिती एकूण वीज निर्मितीच्या सुमारे 75% इतकी आहे. भारतात सध्या दरदिवशी 1,29,503 मेगावॅट(MW) विजेची मागणी आहे. मात्र, या तुलनेत सध्या 1,29,216 MW वीज पुरवठा केला जात आहे. पिक टाईममध्ये ही मागणी 2,26,870 मेगावॅटवर पोहोचते आणि 2,15,882 मेगावॅट वीज पुरवठा केला जातो. भारतात सध्या 1,624.बिलीयन वॅट वीज निर्मिती केली जाते.