Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Redmi Note13 ची सिरीज लॉन्च; जाणून घ्या 200MP कॅमेरा असलेल्या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi Note13 ची सिरीज लॉन्च; जाणून घ्या 200MP कॅमेरा असलेल्या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये

Image Source : www.twitter.com/Maii_HD

शाओमीने लॉन्च केलेल्या Redmi Note 13 या सिरीजचे 3 वेगवेगळे मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ या फोनचा समावेश आहे.

मोबाईल निर्मिती क्षेत्रात नावाजलेल्या शाओमी या कंपनीने Redmi 12 च्या सिरीजनंतर आता Redmi Note 13 ची सिरीज लॉन्च केली आहे. Xiaomi ने 22 सप्टेंबरला Redmi Note 13 या सिरीजमध्ये धमाकेदार फिचर्स असलेले 3 मॉडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा केंद्र बिंदू म्हणजे 200 मेगा पिक्सेल कॅमेरा आहे. दरम्यान, कंपनीने  चीनमध्ये हा फोन लॉन्च केला असून पुढील आठवड्यापासून त्याची विक्री सुरू केली जाणार आहे.

तिन्ही मॉडेल्सच्या वेगवेगळ्या किमती

शाओमीने लॉन्च केलेल्या  Redmi Note 13 या सिरीजचे 3 वेगवेगळे मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ या फोनचा समावेश आहे. या फोनची वैशिष्ट्यांचा विचार केला असता कंपनीने  तिन्ही स्मार्टफोनसाठी स्टोरेज, कॅमेरा, बॅटरीयासह दमदार फिचर्स दिले आहेत. Redmi Note 13 हा 4 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून 6GB + 128GB या फोनच किंमती अंदाजे 13,900 रुपये असेल, तर 8GB + 128GB स्टोअरेजच्या फोनची किंमत ही 15000 आणि  8GB + 256GB या फोनसाठी अंदाजे 17400 रुपये, तसेच टॉप व्हेरियंट 12GB + 256GB या मॉडेलची किंमत 19700 रुपयांच्या दरम्यान असेल. या मॉडेलमध्ये 100MP कॅमेरा तर सेल्फीसाठी 16MP कॅमेरा वापरण्यात आला आहे. मोबाईलला 5000mAh ची बॅटरी वापरण्यात आली आहे.

200 मेगा पिक्सल कॅमेरा-

Redmi Note 13 Pro आणि Pro+ या फोनच्या वैशिष्ट्याबाबत आणि किंमतीचा आढावा घेतला असता, या दोन्ही फोनला कंपनीने 200 MP कॅमेरा दिला असून सेल्फी कॅमेरा 16MP चा देण्यात आला आहे. तसेच मोबाईलला 6.67 इंचाचा 1.5K रिज्युलेशनचा FHD+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेलसाठी गोरिल्ला ग्लासचा वापर करण्यात आला आहे. तसेच Note 13 Pro मध्ये Snapdragon 7s Gen2 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर Redmi Note 13 Pro+ या मॉडेलसाठी 7200 Ultra प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. बॅटरीमध्ये Redmi Note 13 Pro+ या मोबाईलसाठी 5000mAh ची बॅटरी वापरण्यात आली असून यासाठी 120W च्या फास्ट चार्जरचा वापर करण्यात आला आहे. तसेच Note 13 Pro साठी 5100mAh बॅटरी असून 67W चार्जिंगचा सपोर्ट वारण्यात आला आहे.

जाणून घ्या किमतीचा अंदाज

Redmi Note 13 Pro अंदाजे 17,400 रुपयांपासून 24 हजारांपर्यंत उपलब्ध होईल. यामध्ये 8GB RAM मध्ये 128GB आणि 256GB स्टोअरेज, तसेच 12GB + 256GB,आणि 512GB स्टोअरेजचे पर्याय उपलब्ध आहेत. याच बरोबर टॉप मॉडेलमध्ये 16GB + 512GB स्टोअरेज कॅपिसिटीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्याची किंमत अंदाजे  24,300 असेल.

Redmi Note 13 Pro+ या फोनसाठी तीन वेगवेगळे स्टोअरचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये 12GB + 256GB स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत अंदाजे 22,800 रुपये, तर 12GB + 512GB यासाठी 25,100 रुपये आणि 16GB + 512GB साठी  26,200 रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे.