Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Redmi 12' 5G: स्मार्टफोनच्या 5G श्रेणीत 'Redmi 12' ची एंट्री! अवघ्या 10 हजार 999 रुपयांत मिळणार 5G चा अनुभव

Redmi 12

Image Source : www.mi.com

Redmi 12 5G Phone Launch: मागील काही दिवसांपासून स्वस्त दरातील 5G फोन बाजारात लॉंच करण्याचे संकेत शाओमीकडून देण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

भारतात 5G सेवा बहुतांश शहरांमध्ये सुरु झाली आहे. सध्या 4G सेवा वापरत असलेले कोट्यवधी ग्राहक लवकरच 5G अपग्रेड होतील. त्यांना परवडेल अशा अविश्वसनीय किंमतीत शाओमी कंपनीने Redmi 12 हा  5G स्मार्टफोन लॉंच केला आहे. Redmi 12 या  5G फोनची किंमत अवघी 10 हजार 990 रुपये इतकी आहे. 5G स्मार्टफोन्सच्या श्रेणीत हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन असल्याचे बोलले जाते.

मागील काही दिवसांपासून स्वस्त दरातील 5G फोन बाजारात लॉंच करण्याचे संकेत शाओमीकडून देण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

गेल्या आठवड्यात दिल्लीत Redmi 12 5G या लेटेस्ट स्मार्टफोनचे अधिकृत लॉंचिंग करण्यात आले. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आतापर्यंत कंपनीने 30 हजारांहून अधिक रेडमी 12 5G फोनची विक्री केली आहे.

Redmi 12 5G हा तीन रंगात आहे. मोठ्या बॅटरीमुळे या फोनचे वजन इतर फोन्सच्या तुलनेत थोडे जास्त असले तरीही तो 200 ग्रॅमपेक्षा कमीच आहे. फोन पडल्यामुळे होणारे नुकसान, ओरखडे यापासून संरक्षण देणारे शक्तिशाली काचेचे आवरण या फोनचे खास वैशिष्ट्य आहे.

या फोनला 6.79 इंचाची एचडी आणि आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. यात MIUI 14 आणि Android 13 चा समावेश आहे. 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे.

त्याशिवाय या फोनमध्ये प्री लोडेडे अॅप्स, फिंगरप्रींट स्कॅनर, IR एमिटर, वायफा, ब्लुटूथ 5.3 कनेक्टिव्हीटी, 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेत डेप्थ सेन्सर यांचा समावेश आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील आहे.

अविश्वसनीय किंमत

Redmi 12 5G या स्मार्टफोनची किंमत 10 हजार 999 रुपयांपासून सुरु होते. Redmi 12 5G चे बेस मॉडेल 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह मूळ किंमत 11 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम असलेला फोन 13 हजार 499 रुपयांना तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज क्षमता असलेला फोन 15 हजार 999 रुपयांना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सर्वच मॉडेलवर कंपनीकडून एक्सचेंज बोनस म्हणून 1000 रुपयांची सवलत देण्यात आली आहे.