Why would a Check Bounce: बॅंके व्यवहारामध्ये ‘चेक’ (Cheque) या गोष्टीला अधिक महत्व आहे. कारण बॅंकेचा कोणताही मोठा व्यवहार हा चेकच्या स्वरूपातच केला जातो. जसे की, घराचे भाडे, सरकारचे विविध कर, जमिनी-खरेदी विक्री व्यवहार,शैक्षणिक शुल्क आदि. पूर्वी या चेकवरील रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बरेच दिवस लागत होते, आता मात्र जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात चेक हा तीन दिवसात मंजूर केला जातो. म्हणजेच यावरील रक्कम तीन दिवसात खात्यात जमा होते. जर हा चेक बाउन्स झाला, तर तुमची रक्कम खात्यात जमा होत नाही. हा ‘चेक बाउन्स’ (Check Bounce) होणे म्हणजे नक्की काय, यामागील कारणे कोणती आहेत, ही जाणून घेवुयात.
Table of contents [Show]
खात्यात पैसे नसणे (No Money in the Account)
सर्वप्रथम कारण म्हणजे जी व्यक्ती चेक लिहून देते, त्या व्यक्तीच्या खात्यात तेवढी रक्कम उपलब्ध नसेल तर तुमचा चेक रद्द म्हणजेच बाउन्स होतो. त्यामुळे नेहमी कोणालाही चेक लिहून देताना, खात्यात तेवढी रक्कम शिल्लक आहे का, हे तपासून पाहणे. कारण चेक बाउन्स झाल्यास बॅंक खात्यातील पैसे दंड स्वरूपात कट करून घेते.
खाते सील (Account seal)
जर चेक देणाऱ्या व्यक्तीचे खाते हे फ्रीज किंवा सील म्हणजेच बंद असेल, तर मग त्या खात्यात कितीही रक्कम शिल्लक असली, तरी बॅंक कोणत्याही परिस्थितीत तो चेक मंजूर करत नाही.
कालावधी (Duration)
चेक देणाऱ्या व्यक्तीने दिलेला चेक हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यापूर्वीचा असेल, तर त्या चेकचा बॅंक स्वीकार करत नाही.
सही (The Signature)
चेक देणाऱ्या व्यक्तीची खात्यावरील सही व चेकवरील सही यात तफावत (फरक) असेल किंवा योग्य ठिकाणी सही केलेली नसेल किंवा सहीबाबत काही शंका निर्माण झाल्यास, बॅंक त्वरित चेक नाकारते.
खाडाखोड (Word Mistake)
जर कोणत्याही चेकवर खाडाखोड असेल, तर बॅंक तो चेक रद्द करते. तसेच तारखेत बदल केला असेल किंवा चेकवर लिहिलेली रक्कम व अंकात लिहिलेली रक्कम ही वेगवेगळी असेल, तर बॅंक तो चेक बाउन्स करते म्हणजेच त्या चेकचा स्वीकार करत नाही.