Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme आणि OnePlus कंपनी भारतातून गुंडाळणार गाशा; टीव्ही उत्पादन आणि विक्री करणार बंद

Realme and OnePlus company stop TV production

Image Source : www.gsmarena.com

SMART TV Market: मूळच्या चीनमधील असलेल्या आणि अल्पावधीत भारतात प्रसिद्ध झालेल्या OnePlus आणि Realme इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी इथून पुढे भारतात टीव्हीचे उत्पादन आणि विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मूळच्या चीनमधील असलेल्या आणि अल्पावधीत भारतात प्रसिद्ध झालेल्या OnePlus आणि Realme इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी इथून पुढे भारतात टीव्हीचे उत्पादन आणि विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही कंपन्यांनी भारतात फक्त स्मार्टफोनशी संबंधित व्यवसाय करणार असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामागे इतर देशातील कंपन्यांचा दबाव असल्याचे म्हटले जात आहे. पण चीनमधील शिओमी कंपनीचीच टीव्ही प्रोडक्शनमध्ये या दोन कंपन्यांसोबत तीव्र स्पर्धा होती. स्वस्तात अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा टीव्ही बनवण्यात या कंपन्यांचा हातखंडा होता. पण या कंपन्यांनी इथून पुढे भारतात टीव्हीची निर्मिती आणि विक्री न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिओमी या कंपनीला याचा जबरदस्त फायदा होणार असल्याचे दिसून येते.

भारतातील ग्राहकांकडून या टीव्ही कंपन्यांना चांगली मागणी होती. इंटरनेटचा वाढता वापर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर वनप्लस आणि रिअलमीच्या स्मार्ट टीव्हींना मागणी होती. या कंपन्यांनी टीव्ही सेक्टरमधील ब्रॅण्डिंगसाठी आणि विक्रीसाठी मोठी गुंतवणूकसुद्धा केली होती. तरीही या कंपन्यांनी असा निर्णय का घेतला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सध्या भारतात टीव्ही कंपन्यांमध्ये एलजी, सॅमसंग, सोनी आणि पॅनासॉनिक या नामांकित कंपन्यांसह चीनमधील शिओमी आणि टीसीएल या कंपन्यांनाही मोठी मागणी आहे. या व्यतिरिक्त इतरही छोट्यामोठ्या कंपन्या मार्केटमध्ये आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. भारतात सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा (ICC Cricket World Cup 2023) सिझन सुरू आहे. इथले प्रेक्षण क्रिकेटसाठी वेडे आहेत आणि त्यात सध्या भारतात फेस्टिव्हल सिझन सुरू असूनही, ऐन बिझनेस करण्याच्या काळात या कंपन्यांनी असा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

2023 मध्ये पहिल्या 6 महिन्यात भारतात स्मार्ट टीव्ही खरेदीचे प्रमाण 8 टक्क्यांनी वाढले. या कालावधीत भारतात जवळपास 4.5 मिलिअन (45 लाख) टीव्ही संच भारतात विक्रीसाठी आयात करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. 2022 मध्ये एकूण 9.8 मिलिअन (98 लाख) टीव्ही संच आयात केले होते. एलजी, सॅमसंग, सोनी या ब्रॅण्डेड कंपन्यांच्या टीव्हीच्या किमतीपेक्षा शिओमी, वनप्लस, रिअलमी, टीसीएल या चायनिज कंपन्यांचे टीव्ही 30 ते 50 टक्क्यांनी स्वस्त असल्याने यांची मागणी वाढली आहे.