Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आरबीआयने कार्ड टोकनायझेशनची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली

आरबीआयने कार्ड टोकनायझेशनची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली

मोठमोठ्या बॅंकांनी व कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांचे कार्ड टोकनायझेशन करून घेतले. पण लहान व्यापाऱ्यांना 30 जून पर्यंत सर्व ग्राहकांचे कार्ड टोकनायझेशन (Tokenization of Cards) करून घेणं अडचणीचं ठरत होतं.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा एकदा कार्ड टोकनायझेशनची (Tokenization RBI) अंतिम मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली. 30 जूनच्या आधीच्या अंतिम मुदतीपासून, रिझर्व्ह बँकेने अंतिम मुदत 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत वाढवली (Tokenization RBI Extended) आहे. कारण टोकन वापरून प्रक्रिया केलेल्या व्यवहारांची संख्या अद्याप व्यापाऱ्यांच्या सर्व कॅटेगरींमध्ये अजून वाढलेली नाही.


प्रत्येक वेळी जेव्हा ग्राहक ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) करतात तेव्हा क्रेडिट व डेबिट कार्डचा तपशील संग्रहित केला जातो. यावर उपाय म्हणून RBI ने कार्ड-ऑन-फाईल टोकनायझेशन ऑर्डर जारी केली आहे. या आदेशा अंतर्गत सर्व अधिकृत कार्ड नेटवर्क कंपन्यांनी ग्राहकांना कार्ड टोकनायझेशन सेवा ऑफर केली पाहिजे. तसेच व्यापाऱ्यांनी संग्रहित केलेला ग्राहकांचा डेटा 30 जूनपर्यंत काढून टाकावा, असे आदेश दिले होते. आरबीआयच्या या आदेशावर मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांचे कार्ड टोकनायझेशन केले. पण लहानसहान व्यापाऱ्यांना 30 जून पर्यंत हे पूर्ण करणं अवघड जात होते. त्यामुळे या व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आरबीआयने कार्ड टोकनायझेशनची मुदत (Tokenization RBI Deadline) 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली.

टोकनायझेशन म्हणजे काय?

टोकनायझेशनमुळे प्रत्येक वेळी ग्राहकाला ऑनलाईन पेमेंट करताना आता नव्याने डिटेल्स टाकावे लागणार आहेत. पूर्वी ग्राहकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डची माहिती व्यापारी कंपन्यांकडून जतन केली जात होती. आता ती कंपन्यांना करता येणार नाही. टोकनायझेशनद्वारे ग्राहकाला एक नवीन टोकन प्राप्त होणार आहे. त्याद्वारे ग्राहकाची कार्डची माहिती सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

Tokenization Process


आरबीआयने ही मुदत वाढवताना म्हटले आहे की, काही लहानसहान उद्योगांनी कार्ड टोकनायझेशनच्याबाबत काही अडचणी मांडल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी आणि कार्डधारकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आरबीआयने सरसकट कार्ड टोकनायझेशनची मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. दरम्यान यापूर्वी, आरबीआयने 31 डिसेंबर, 2021 नंतर कार्ड नेटवर्क कंपन्या ग्राहकांचा डेटा सेव्ह करू शकणार नाही, असे आदेश दिले होते. पण त्यावेळी ही आरबीआयने ही मुदत 30 जून, 2022 पर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही मुदत 30 सप्टेंबर, 2022 अशी केली आहे. आतापर्यंत जवळपास 19.5 कोटी कार्ड टोकन (Tokenization of Cards) तयार केले गेले आहेत. तसेच कार्डधारकांसाठी टोकन तयार करणे ऐच्छिक आहे. ज्यांना टोकन बनवायचे नाही ते व्यवहार करत असताना कार्ड तपशील मॅन्युअली प्रविष्ट करून पूर्वीप्रमाणे व्यवहार करणे सुरू ठेवू शकतात, ज्याला गेस्ट चेकआउट व्यवहार (Guest Checkout Transaction) म्हणून ओळखले जाते.