नुकतेच त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राकेश झुनझुनवाला यांचे काय होते ट्रेडिंग सीक्रेट आणि कोणता शेअर ठरला त्यांच्या करिअरमधला टर्निग पॉइंट ते जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. 37 वर्षाची समृद्ध अशी त्यांची ट्रेडिंगमधील कारकीर्द (करिअर) होती. या कालावधीत 5 हजार रुपयापासून 16 हजार कोटी रुपयापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
शेअर मार्केटमध्ये अशी झाली इंट्री
शेअर मार्केटमध्ये काम करायच तर संयम खूपच महत्वाचा असतो. हाच संस्कार त्यांच्यावर अगदी लहानपणीच झाला होता. मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अगदी ते 14 वर्षाचे असताना मित्रांबरोबर शेअर्सविषयी गप्पा मारत असत. लहानपणी एकदा वडिलांना राकेशने विचारले, शेअर्स म्हणजे काय? त्यावर ‘’न्यूज पेपर वाच, शेअर्स मधले चढ-उतार समजून घे,'' असे वडिलांनी सांगितले. मनात या विषयाची जिज्ञासा होतीच. म्हणून शाळकरी असणाऱ्या राकेशने त्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात केली. आपल्याला या विषयाचे आता चांगले नॉलेज मिळाले आहे, हे लक्षात आल्यावर त्याने शेअर मार्केटसाठी वडिलांकडे पैसे मागितले. यावर वडिलांनी राकेशला जे सांगितल ते ट्रेडर बनू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. कारण आज मार्केटविषयी कित्येक जण असे काही चित्र आपल्यासमोर उभे करून ठेवतात की ते पाहून ‘यात काय विशेष आहे’ फक्त पैसे टाकले की झाले,' अस बऱ्याच जणांना वाटत. त्यांनी राकेशला यातल वास्तव समजावून आधी प्रोफेशनल शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनी ते ही मग लावून केले. आणि अखेर ते चार्टर्ड आकाउंटांत बनले . आणि आता ते शेअर मार्केटमध्ये इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले.
पहिली खरेदी आणि टर्निंग पॉइंट
अखेर झुनझुनवाला यांनी पहिल्यांदा खरेदी केली ते वर्ष होते 1985. BSE सेन्सेक्स होता 150 अंकांवर! सुरुवात तर झाली होती. मात्र पहिल मोठ प्रॉफिट मिळवायला 1986 साल उजाडाव लागल. त्यांनी Tata Tea चे 5 हजार शेअर्स खरेदी केले तेव्हा दर होता 43 रुपये. 3 महिन्यांतर ते शेअर्स त्यांनी 143 रुपयांना विकले , या व्यवहारात त्यांना सुमारे 5 लाख इतका नफा झाला होता. यानंतर त्यांची मार्केटमधली घोडदौड सुरू झाली. 1986 या 89 या काळात 25 लाख कमावले. टायटन कंपनीचा पेनी स्टॉक हा त्यांच्या मार्केटमधील करिअरमधला दूसरा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. Titan चा हा शेअर्स त्यांनी केवळ 3 रुपयांना खरेदी केला होता. 2002 चे ते वर्ष होते. हे शेअर्स त्यांनी विकले तेव्हा भाव झाला होता 390 रुपये. या ट्रेडमध्ये त्यांना तब्बल 2 हजार 100 कोटींचा नफा झाला होता.
मंदीत अशी साधली संधी
शेअर मार्केटमध्ये चढ-उतार देखील असतात. ते त्यांनीही अनुभवले. 2011 नंतर त्यांनी गुंतवणूक केलेलल्या शेअर्समध्ये 30 टक्के घट झाली होती. याचबरोबर शेअर मार्केटमध्ये एक आणखीही मोठी रिस्क असते. ती म्हणजे व्यापक अर्थव्यवस्थेची. एखाद्या कंपनीचे फंडामेंटल कितीही स्ट्रॉंग असले अर्थव्यवस्थेतच जेव्हा मोठे चढ उतार होतात तेव्हा भलेभले हतबल होताना दिसतात. असाच तो 2008 च्या मंदीचा काळ होता. मार्केटमधल्या आपल्या पैशाची चिंता सगळ्यांना होती. मात्र या ही स्थितीत राकेश झुनझुनवाला हे मार्केटमध्ये ताकदीने उभे राहिले. त्यांनी शॉर्ट सेलिंगचा पर्याय स्वीकारला.शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करताना सामान्यपणे आपण पहिल्यांदा शेअर खरेदी करतो आणि नंतर जास्त किमतीवर विकण्याचा प्रयत्न करतो. परंतु शेअर बाजारात अशी एक सुविधा देखील आहे की ज्यामध्ये पहिल्यांदा आपण शेअर विकायचे आणि शेअरची किंमत कमी कमी झाली की ते पुन्हा खरेदी करायचे व त्यातून नफा कमवायचा. या ट्रेडिंगला शॉर्ट सेलिंग असे म्हणतात .
एकूणच त्यांची मार्केटमधील करिअर बघितल्यावर King of Indian share market किवा Warren buffett of india असे त्यांना गौरवाने का म्हटले जाते, ते लक्षात येते.