Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

QueenElizabethII Net Worth; महाराणी एलिझाबेथ द्वितीय अन् राजघराण्याकडे आहे प्रचंड संपत्ती

Queen Elizabeth II Death

Queen Elizabeth II Death: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बालमोरल राजवाड्यात त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 70 वर्ष त्यांनी इंग्लंडचे महाराणीपद भूषवले.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर 2022 रोजी  निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. स्कॉटलंडमधील बालमोरल राजवाड्यात त्यांची प्राणज्योत मालवली. (Queen Elizabeth II Died at the age of 96 year in Scotland)

ब्रिटीश रॉयल फॅमिलीची स्थावर मालमत्ता जवळपास 72 बिलियन पौंड (एकूण 6631 कोटी रुपयांची संपत्ती) इतकी आहे. (Total Net Worth of Royal Family) यासाठी मोनार्ची पीएलसी ही कंपनी या सर्व मालमत्तांवर देखरेख करते. या कंपनीत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह राजघराण्यातील सात सदस्यांचा समावेश आहे. ही संपत्ती राजघराण्यातील कोणतीही व्यक्ती विकू शकत नाही. ही राजघराण्याची संपत्ती आहे. यामध्ये क्राऊन इस्टेट (19.5 बिलियन डॉलर) , बकिंगहॅम पॅलेस (4.9 बिलियन डॉलर), दि डचे ऑफ क्रॉनवॉल (1.3 बिलियन डॉलर) दि डचे ऑफ लॅक्साटर (748 मिलियन डॉलर), किंग्सटन पॅलेस (630 मिलियन डॉलर) आणि दि क्राऊन इस्टेट ऑफ स्कॉटलंड (592 मिलियन डॉलर) यांचा समावेश आहे. 

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे जवळपास ५०० मिलियन डॉलरची संपत्ती आहे. ७० वर्षे राज घराण्याच्या प्रमुख या नात्याने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना संपत्ती मिळाली होती. रॉयल फर्मकडे ही संपत्ती सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराणीला क्वीन मदरकडून जवळपास ७० मिलियन डॉलर संपत्ती मिळाली होती. राजघराण्याकडे अनेक महागड्या आणि दुर्मिळ वस्तू देखील आहेत. यात महागडी पेंटिग्ज, दुर्मिळ रत्ने, हिरे, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू, शिल्पे यांचा संग्रह आहे.

महाराणी एलिझाबेथ यांना दरवर्षी सरकारकडून निधी दिला जातो त्याला सोव्हरेन ग्रँट असं म्हटलं जातं. 2020 मध्ये देण्यात आलेली रक्कम 86.3 दशलक्ष पौंड इतकी होती. यापैकी 51 मिलियन पौंडची तरतूद ही राणीच्या संपत्तीची काळजी घेण्यासाठी, राणीच्या घरी काम करणाऱ्यांवरील खर्च, राणीचा प्रवास इत्यादीसाठी करण्यात आली. याशिवाय उरलेली रक्कम ही बकिंगहॅम पॅलेससाठी ठेवली जाते.

सोव्हरेन ग्रँट नावाच्या करदात्यांच्या निधीतून महाराणीला उत्त्पन्न मिळायचं. हा निधी दरवर्षी ब्रिटीश राजघराण्याला दिला जायचा. या ग्रँटची सुरुवातीला राजा जॉर्ज तृतीय याच्याकडून करण्यात आलेल्या करारानुसार होती. त्याने आपल्या येणाऱ्या पिढीसाठी वर्षाला निधी देण्यात येईल, त्याबदल्यात क्राउन इस्टेटमधून मिळणारं उत्पन्न सरकारला देण्याचं मान्य केलं होतं.

Image Source : Twitter