Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power grid Bonus Share: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने दिला बोनस शेअर, यापूर्वी कंपनीने दिलाय बंपर डिव्हीडंड

power grid corporation

Image Source : www.powergrid.in

Power grid Bonus Share: सार्वजनिक क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांमध्ये नियमित डिव्हीडंड देणारी सरकारी कंपनी अशी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची ओळख आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे डिव्हीडंड यिल्ड 7.54% इतके आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या शेअरहोल्डर्ससाठी यंदाचे वर्ष जबरदस्त ठरले आहे. पॉवरग्रीडने शेअरहोल्डर्सला बोनस शेअर दिला आहे. बोनस शेअर प्रमाण 1:3 इतके आहे. बोनसबरोबरच कंपनीने 4.75 रुपये प्रती शेअर डिव्हीडंड दिला होता.

पॉवर ग्रीड बोनस शेअर वाटपाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. बोनस शेअरसाठी 12 सप्टेंबर 2023 ही रेकॉर्ड डेट होती. या तारखेपर्यंत ज्यांच्या डिमॅट खात्यात पॉवर ग्रीडचे शेअर होते ते बोनस शेअरसाठी पात्र ठरले. कंपनीकडून प्रत्येक शेअरवर तीन शेअर बोनस देण्यात येणार आहे.

आज बुधवारी 21 सप्टेंबर 2023 रोजी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचा शेअर 201.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये 1.54% घसरण झाली. पॉवर ग्रीडचा शेअर 52 आठवड्यांत 205.90 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. याच काळात त्याने 139.76 रुपयांचा नीचांक गाठला होता. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल 187267.59 कोटी रुपये इतके आहे.

पॉवर ग्रीडने चालू आर्थिक वर्षात शेअर होल्डर्सला लाभांश वाटप केले होते. 8 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीने प्रती शेअर 4.75 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. वर्ष 2022 मध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने तीन वेळा डिव्हीडंड दिला होता. फेब्रुवारी, ऑगस्ट आणि नोव्हेंबर या महिन्यात अनुक्रमे 5.50 रुपये, 2.25 रुपये आणि 5 रुपयांचा डिव्हीडंड देण्यात आला होता.

मागील 10 वर्षांत शेअरच्या कामगिरीचा आढावा घेतला तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या शेअरने गुंतवणूकदारांना सरासरी 250% परतावा दिला आहे. मागील तीन वर्षात या शेअने 98% वाढ अनुभवली. सहा महिन्यात तो 15% ने वाढला आहे.

डिव्हीडंड देणारी सरकारी कंपनी अशी ओळख

सार्वजनिक क्षेत्रातील लिस्टेड कंपन्यांमध्ये नियमित डिव्हीडंड देणारी सरकारी कंपनी अशी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची ओळख आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनचे डिव्हीडंड यिल्ड 7.54% इतके आहे. 10 मार्च 2008 पासून पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनने 36 वेळा डिव्हीडंड इश्यू केला आहे. 

जूनच्या तिमाहीत 3602 कोटींचा नफा

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला 30 जून 2023 अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत 3602.25 कोटींचा नफा झाला होता. याच तिमाहीत कंपनीला 11257.60 कोटींचा महसूल मिळाला. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% घसरण झाली.