Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Poultry Industry in India: पोल्ट्री उद्योग संकटात,पशुखाद्यासाठी मका निर्यातीवर निर्बंध लागू करण्याची मागणी

Poultry Industry in India

Poultry Industry in India: थर्टी फर्स्ट जसा जवळ येतो तसे चिकन मटणाचे भाव वाढायला लागतात हे काही नवीन नाही. मात्र सध्या पोल्ट्री उद्योग वेगळ्याच संकटात सापडला आहे. कोंबड्यांचे खाद्य असलेला मका निर्यात बंद करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून करण्यात आली आहे.

देशातील पोल्ट्री उद्योगाला सध्या पशुखाद्यातील महागाईची झळ बसत आहे. कोंबड्यांचे प्रमुख खाद्य मक्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक बाजारात मक्याचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा, यासाठी तातडीने मक्याची निर्यात बंद करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाने केंद्र सरकारकडे केली आहे.(Poultry Industry Seeks Corn Export Curb) मका निर्यात सुरुच राहिली तर देशात चिकनचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कोंबडीचे खाद्य बनवण्यात मका हे महत्वाचे पिक आहे. मात्र यंदा बिगर मोसमी पावसाचा मक्याच्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात मक्याची मर्यादित आवक आहे. परिणामी यंदा मक्याचा भाव तेजीत आहे. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मक्याला चांगला भाव मिळत असल्याने मक्याची निर्यात देखील जोरात सुरु आहे. याचा एकत्रित परिणाम स्थानिक बाजारात दिसून आले आहेत. मक्याची मोठी बाजारपेठ असलेल्या बिहारमधील  गुलाब बाग मार्केटमध्ये मक्याचा भाव 12% नी वाढला आहे. 2021 च्या तुलनेत इथल्या बाजारात मक्याचा दर प्रति टन 25000 रुपये इतका वाढला आहे. ज्यामुळे पोल्ट्री उद्योगाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

मागील काही वर्षांपासून मक्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. अलिकडे झालेली दरवाढ पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडणारी आहे, असे मत पशुखाद्य उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष नीरज कुमार श्रीवास्तव यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. श्रीवास्तव म्हणाले की या दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकता येणार नाही. अन्यथा अंडी आणि चिकन  सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील.संपूर्ण पोल्ट्री उद्योग महागाईशी तोंड देत असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ मकाच नाही तर तुकडा तांदुळ देखील महाग झाल्याने पोल्ट्री उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. हे दोन्ही घटक कोंबड्यांचे महत्वाचे खाद्य आहे. पशु खाद्यावरील खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. कोंबड्यांसाठी मका बदलून इतर खाद्य देणे अशक्य असल्याने या मक्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने तातडीने निर्यात बंदी किंवा ती कमी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.  

मका निर्यात तातडीने थांबवण्याची गरज (Need Curb On Corn Export)

  • भारतातून चालू 2022 या वर्षातील जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 2.4 दशलक्ष टन मका निर्यात करण्यात आला आहे. 
  • वर्ष 2021 मध्ये 3.6 दशलक्ष टन आणि 2020 मध्ये 1.9 दशलक्ष टन मका निर्यात करण्यात आला होता.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय मक्याचा दर प्रति टन 315 डॉलर ते 320 डॉलर या दरम्यान आहे.
  • किफायतशीर किंमतीमुळे भारतीय मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. 
  • अर्जेंटिनाच्या मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति टन 350 डॉलर इतका भाव मिळतो. 
  • अमेरिकेनंतर अर्जेंटिना हा मक्याचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. भारताला चांगला भाव मिळत असला तर तातडीने मका निर्यात थांबवण्याची मागणी श्रीवास्तव यांनी केली. 
  • भारतातून दुबई, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम या देशांना मक्याची निर्यात केली जाते.