8000 ते 5000 BCE दरम्यान आधुनिक काळातील दक्षिण पेरू आणि वायव्य बोलिव्हिया या प्रदेशात बटाटा ही पहिली घरगुती भाजी होती. 17 व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज खलाशांनी भारतात याची ओळख करून दिली आणि त्याची लागवड ब्रिटिशांनी उत्तर भारतात पसरवली. बटाटा हे देशातील प्रमुख व्यावसायिक पिकांपैकी एक आहे. आज हा जगभरात पसरलेला बटाटा बहुतेक देशांमध्ये ते मुख्य पीक म्हणून घेतले जाते. भारतातील 23 राज्यांमध्ये याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात केवळ 5 टक्के बटाट्याचे उत्पादन
महाराष्ट्रात आपण वापर करतो त्याच्या केवळ ५ टक्के बटाटा उत्पादित होतो.
गुजरात आणि मध्य प्रदेशातून आपण ९५ टक्के बटाट्याची गरज पूर्ण करतो. बटाटे केवळ रब्बी हंगामात घेतले जातात. महिन्याला थोडेथोडके नव्हे तर साधारणपणे ६० हजार टन बटाटे खाल्ले जातात. बटाट्याचे पुराण येथेच थांबत नाही, हॉटेल व्यवसायात तर त्यांचे सर्वाधिक महत्त्व आहे. मुंबई महानगर विभागात (एमएमआर) रोज प्रत्येकी एक हजार टन कांदे आणि बटाटे खाल्ले जातात. त्यानंतर पुणे आणि इतर महानगरांचा क्रमांक लागतो..
बटाटा वर्षभर महागणार
बटाटा हा प्रत्येक संस्कृतीत महत्वाचा आणि स्वयंपाक करताना हमखास वापरला जाणारी भाजी आहे पण हा बटाटा आता वर्षभर महागच राहणार याची सर्वत्र चर्चा आहे. सध्या बटाट्याची किंमत 25 ते 30 रुपये प्रति किलो इतकी असून भविष्यात ती वाढण्याची शक्यता दर्शवली आहे यामुळे बटाट्या पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांच्या किमतीत सुद्धा वाढ होऊ शकते. उपवासाच्या दिवशी बटाटा पासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थाना म्हणजेच वेफर, चिवडा, भाजी, खिचडी यांना महत्व दिले जाते.
भारतात उत्पादन कमी
भारतात सर्रास वापरला जाणारा बटाट्याचे उत्पादन यंदा कमी आले आहे. यामुळे भारताचा तिजोरीवर परिणाम होण्याची शक्यता पण दर्शवली जातेय. 561 लाख टन अपेक्षित असताना प्रत्यक्ष 536 लाख ताणावर आले आहे. सरासरी 15 टक्क्यांकी उत्पादन कमी झाले आहे. देशात सर्वाधिक म्हणजे देशातील एकूण उत्पन्नच्या तुलनेत 25 टक्के उत्पादन हे एकट्या गुजरात मध्ये होते. यंदा एकूण 1.26 लाख हेक्टरवर लागवड होऊन 38 लाख टन बटाटा उत्पादन झाले आहे. बटाटा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य पश्चिम बंगालमध्ये बटाटा उत्पादन 23 टक्क्यांनी कमी झाले आहे. याचा परिणाम बटाट्याच्या किमतीवर दिसून येत आहे.