Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme: पोस्टाच्या टर्म डिपॉझिट योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर किती परतावा मिळेल? कर सवलतीचा लाभ घेता येईल?

Post Office Term Deposit Scheme

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट योजनेतील (Post Office Term Deposit Scheme) गुंतवणूक कालावधी हा वेगवेगळा आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. जर तुम्हीही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला किती परतावा मिळेल आणि कर सवलतीचा लाभ घेता येईल का? जाणून घेऊयात.

हल्ली आर्थिक गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. खासगी क्षेत्रातील कोणत्याही नवख्या योजनेत गुंतवलेले पैसे बऱ्याच वेळा मोठी जोखीम  ठरू शकतात. याउलट पोस्टातील गुंतवणूक ही अधिक सुरक्षित मानली जाते. आजही बहुतांश लोक पोस्टातील योजनेत गुंतवणूक करतात. पोस्टाकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट योजनेत (Post Office Term Deposit Scheme) गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवलेले पैसे हे अधिक सुरक्षित असून सर्वाधिक परतावा देणारे आहेत. महत्त्वाचं म्हणजे याचा परिपक्व कालावधी हा वेगवेगळा आहे. जो गुंतवणूकदार निश्चित करू शकतो. जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील, तर तुम्हाला यातून किती परतावा मिळू शकेल आणि कर सवलतीचा लाभ घेता येईल का? जाणून घेऊयात.

टर्म डिपॉझिट योजनेचा कालावधी आणि व्याजदर जाणून घ्या

पोस्टाकडून चालवण्यात येणारी टर्म डिपॉझिट (Post Office Term Deposit) ही एक बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी आर्थिक गुंतवणूक करू शकतो. तुम्हाला किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे, हे तुमच्यावर निर्धारित आहे. या योजनेत वार्षिक आधारावर लोकांना व्याजदर (Interest Rate) मिळणार आहे. या योजनेत तुम्ही 1 वर्षासाठी आर्थिक गुंतवणूक केली, तर तुम्हाला 6.8%  व्याजदर मिळेल. 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला 6.9% व्याज मिळणार आहे. तर 3 वर्षासाठी 7 % व्याज देण्यात येणार आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करून केलेल्या 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना 7.5% व्याजदर देण्यात येणार आहे.

1 लाखाच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?

पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूकदार वेगवेगळ्या काळावधीसाठी गुंतवू शकतात. 1 लाख रुपये 1 वर्षासाठी या योजनेत गुंतवल्यावर 6.8% व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी 1 लाख 6 हजार 975 रुपये मिळतील.  2 वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवल्यावर  6.9% हिशोबाने मॅच्युरिटीवेळी 1लाख 14 हजार 663 रुपये मिळतील.

तर 3 वर्षाच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना 7% व्याजदर मिळणार आहे. मॅच्युरिटीवेळी  गुंतवणूकदाराला 1 लाख 23 हजार 144 रुपये मिळतील. तर दिर्घकाळाच्या विचाराने केलेल्या 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.5 हिशोबाने 1 लाख 44 हजार 995 रुपये मिळतील.

कर सवलतीचा लाभ मिळेल का?

पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेतील 1, 2 आणि 3 वर्षाच्या आर्थिक गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेता येणार नाही. गुंतवणूकदाराला यावर TDS भरावा लागेल. मात्र 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर आयकर कायदा 1961 अनुसार 80C चा लाभ घेता येणार आहे. 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला कर सवलतीचा लाभ घेता येणार आहे.


Source: hindi.moneycontrol.com