Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMAY: प्रधानमंत्री आवास योजनेतून सर्वांना परवडणारी घरे कधी मिळणार?

Pradhan Mantri Awas Yojana

Image Source : www.pmay-urban.gov.in

Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरी आणि ग्रामीण कार्यक्रमाची वैधता सरकारने 31 मार्च, 2024 पर्यंत वाढवली आहे. 2024 पर्यंत सरकारने जवळपास 14 लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून ती 1995-96 पासून राबवली जात आहे. पूर्वी ही योजना फक्त ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी राबवली जात होती. पण आता ही योजना 1 जून 2015 पासून ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांसाठी राबवली जात आहे. भारतातील घरांची विषमता आणि कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट्य या योजनेंतर्गत ठेवण्यात आले आहे.

राज्यातील PMAY योजनेची प्रगती

राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचा (शहरी) प्रोग्रेस चार्ट पाहिला असता 31 जुलै, 2023 पर्यंत 14,02,629 घरांना केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यातील 8,15,733 घरे पूर्ण झाली असून त्यातील काही घरांचा लाभार्थींना ताबाही देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास 14 लाख घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी 1,80,151 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातील 26,109 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा मान्य केला असून त्यातून 17,780 कोटी रुपये देण्यात आले आहे.

तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण योजनेमध्ये 14,71,359 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील राज्य सरकारने 14,13,423 घरांना मान्यता दिली आहे. त्यातील 10,28,847 घरे मार्च, 2023 पर्यंत बांधून पूर्ण झाली होती.

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे उभारण्याचे उद्दिष्ट म्हाडा पूर्ण करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये म्हाडाने शहरी विभागांतर्गत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, कर्जत आदी भागांमध्ये परवडणारी घरांची योजना आणली होती.

PMAY STATUS REPORT 31 JULY 2023

प्रधानमंत्री आवास योजना सुरू आहे का?

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021 मध्ये संपूर्ण भारतात 2.95 कोटी घरे उभारण्याचे उद्दिष्टे ठेवले होते. ते पूर्ण करण्यासाठी PMAY योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण कार्यक्रमाची वैधता सरकारने 31 मार्च, 2024 पर्यंत वाढवली आहे. पण सध्या या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. सरकारने अगोदरच्या अर्जधारकांना घरे उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार चार प्रकारांमध्ये विभागण्यात आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कोणाला

लाभार्थी

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)

3 लाखापर्यंत

कमी उत्पन्न गट (LIG)

3 ते 6 लाखापर्यंत

मध्य उत्पन्न गट – १ (MIG-1)

6 ते 12 लाखापर्यंत

मध्य उत्पन्न गट – २ (MIG-2)

12 ते 18 लाखापर्यंत

Source: www.pmayuclap.gov.in

योजनेचा लाभार्थ्यांना लाभ कसा मिळतो?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर खरेदी करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळपास 2.67 लाखापर्यंत अनुदान मिळते. या अनुदानाचा उपयोग लाभार्थी स्वत: घर बांधण्यासाठीदेखील करू शकतो. तसेच लाभार्थ्यांने घरासाठी कर्ज घेतले असेल तर, त्याच्या एकूण कर्जातून 2.50 लाखापर्यंतची रक्कम सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळते. तसेच या योजनेंतर्गत घरे घेणाऱ्या लाभार्थ्यांना मार्केटमधील व्याजदरापेक्षा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.