भारतात पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत अनेक व्यवसाय आजही सुरु आहेत. अनेक कारागिरांनी आपल्या हस्त कला कौशल्याने हे व्यवसाय जिवंत ठेवले आहेत. विशेषत: या व्यावसायिकांना पूर्वीच्या काळी बलुतेदार, अलुतेदार म्हणून ओळखले जात असे. अशा पारंपरिक व्यवसायांचा आणि कारागीरांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाकडून विश्वकर्मा योजना (Vishwakarma Yojana )जाहीर करण्यात आली आहे.
विश्वकर्मा जयंतीदिनी योजनेचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी येत्या काही दिवसांत पारंपरिक कारागीरांसाठी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक कारागिरीत कुशल असलेल्या व्यक्तींना लाभ देण्यात येणार आहे. विश्वकर्मा जयंतीदिनी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या कुशल कारागीरांना मिळणार लाभ
पूर्वीच्या काळात आपआपल्या पारंपरिक कामावरून बलुतेदार आणि अलुतेदार असे व्यावसायिक ओळखले जायचे. यामध्ये लोहार,सुतार, नाव्ही, चांभार, शिंपी (विणकर) परीट, सोनार, कुंभार इत्यादीचा यामध्ये समावेश होत असे, अशा परंपरागत कुशल कारागीरांसाठी विशेषत: ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारकडून विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आली आहे.
15 हजार कोटींच्या निधीची तरतूद
या पारंपरिक कारागीरांच्या हस्तकला व्यवसायाचा विकास करून त्यांना सशक्त करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येणार आहे. या विश्वकर्मा योजनेसाठी केंद्र सरकारकडून सुमारे 13-15 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगामी विश्वकर्मा दिनानिमित्त ही विश्वकर्मा योजना सुरू करण्यात येणार आहे.