गेल्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट अॅन्सिलरीमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. यामध्ये काही पाईप्स कंपन्यांचे शेअर्स असून त्यांनी गुंतवणुकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. त्यांची मागणी जास्त होत असल्याने शेअर्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. तसेच, बिल्डिंग सेक्टरच्या वाढत्या मागणीचा परिणाम कंपन्यांच्या निकालावर दिसून येत आहे.
पाईप्स मार्केट जोशमध्ये!
शेअर मार्केटमध्ये रोज मोठ्या प्रमाणात नवी उलथापालथ पाहायला मिळत आहे. रोज नवनवीन विक्रम होत आहेत. कुठे क्षेत्रीय वाढ आहे तर कुठे निर्देशांकाची सोबत आहे. या वेगवान होणाऱ्या हालचालीमध्ये गुंतवणुकदारांना एक स्पेस मिळते आणि मग त्यातूनच त्यांना चांगला रिटर्न मिळत असतो. आता सध्या रिअल इस्टेट अॅन्सिलरीमध्ये लक्षणीय तेजी दिसून येत आहे. ज्यामध्ये विशेषतः पाईप शेअर्सचा समावेश आहे. यामध्ये कॅफ्टन पाईप (CAPTAIN PIPE), सुप्रीम इंडस्ट्री (SUPREME IND), अॅस्ट्रल (ASTRAL), प्रीन्स पाईप्स (PRINCE PIPES) हे शेअर्स येतात.
बिल्डिंग मटेरिअलमध्ये वाढ
कंपन्यांची ईअर टू डेट रिटर्नची आकडेवारी पाहिल्यास तुम्हाला अंदाज येईल की खरंच स्टाॅक्समध्ये जबरदस्त तेजी आहे. कॅप्टन पाईप कंपनीचा आजपर्यंतचा रिटर्न पाहिल्यास तो 58.82% आहे. याचबरोबर सुप्रीम इंडस्ट्रीचा 45.23% आहे. तर अॅस्ट्रलचा 29.35% आणि शेवटी प्रीन्स पाईप्सचा 6.44 % रिटर्न आहे. ही आकडेवारी डोळे दिपवणारी आहे. Systematix Group ने Q1 मध्ये या सेक्टरची 30% पेक्षा जास्त ग्रोथ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामागे त्यांचा तर्क असा आहे की, मागील 6 महिन्यात ज्या पद्धतीने बिल्डिंग मेटेरिअल सेक्टरमध्ये सुधार झाला त्याचा परिणाम आता या सेक्टरवर पाहायला मिळत आहे.
गुंतवणुकदारांचा होणार फायदा!
कॅप्टन पाईपने म्हटले आहे की, नवीन क्षमता विस्तारामुळे या सेक्टरच्या मागणीचा पुरेपूर फायदा उद्योगांना मिळेल. यासोबतच आर्थिक वर्ष 2024 (FY24) ला विक्रीमध्ये 15-20% वाढ अपेक्षित आहे. तसेच, कच्च्या मालाच्या किमती स्थिरावल्यावर व्हॉल्यूम आणखी वाढेल असे कंपनीचे म्हणणे आहे. कॅप्टन पाईप्स कंपनी शेती आणि प्लंबिंग विभागांसाठी जवळजवळ सर्व प्रकारची पीव्हीसी उत्पादने तयार करते. गेल्या आर्थिक वर्षातील सर्वोत्तम निकालानंतर कॅप्टन पाईप्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे.
शेअर मार्केटमध्ये, गुंतवणुकदार अशा शेअर्सवर नेहमीच बारीक लक्ष देऊन असतात, जे मूलभूतपणे मजबूत आणि चांगला रिटर्न देऊ शकतात. आता येत्या काळात रिअल इस्टेट अॅन्सिलरीची वाढ कशी होणार हे पाहणे निर्णायक ठरणार आहे.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)