Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Accidental Insurance: तुम्हीही दररोज प्रवास करत असाल, तर फक्त 200 रुपयांचा प्रीमियम भरून 'ही' पॉलिसी खरेदी करा

Personal Accidental Insurance

Personal Accidental Insurance: तुम्हीही दररोज कामानिमित्त प्रवास करत असाल, तर किमान 200-300 रुपयांमध्ये व्यक्तिगत अपघात विमा (Personal Accidental Insurance) खरेदी करता येतो. हा विमा अपघात झाला, तर विमाधारकाला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतो. या विम्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात आणि कोणत्या नाही ते जाणून घेऊयात.

तुम्हीही कामानिमित्त दररोज बाहेर प्रवास करता का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर तुम्हाला व्यक्तिगत अपघात विमा खरेदी करण्याची गरज आहे. घरातून बाहेर पडताना कोणाला काय होईल, हे कधीच सांगता येत नाही. अपघातात जर कोणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला त्याचा सर्वात मोठा फटका बसतो. अशा वेळी व्यक्तिगत अपघात विमा (Personal Accidental Insurance) कामी येतो.

ग्राहकांना हा विमा केवळ 200 रुपयांपासून खरेदी करता येतो आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रधान करता येते. या व्यक्तिगत अपघात विम्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात आणि कोणत्या नाही ते जाणून घेऊयात.

व्यक्तिगत अपघात विमा काढण्यासाठी किती खर्च येईल?

व्यक्तिगत अपघात विम्याची (Personal Accidental Insurance) सुरुवात 200 ते 300 रुपयांपासून होते. विम्याचा कव्हर जेवढा मोठा असेल, त्यानुसार प्रीमियमची रक्कम (Premium) ठरवली जाते. विमाधारकाच्या वयानुसार देखील प्रीमियमची रक्कम कमी किंवा जास्त होऊ शकते.

35 वर्षाच्या व्यक्तीचा व्यक्तिगत अपघात विमा काढण्यासाठी 500 ते 1000 रुपये किमान खर्च येतो. ज्यावर त्याला 10 लाखांचे विमा संरक्षण मिळते. विम्याचा प्रीमियम आणि पॉलिसी कव्हर हे कंपनी देत असलेल्या सुविधांवर अवलंबून असतात. हा विमा खरेदी करण्यापूर्वी विमाधारकाने क्लेम रेशो तपासणे गरजेचे आहे.

कोणकोणते फायदे मिळतात?

व्यक्तिगत अपघात विमा (Personal Accidental Insurance) खरेदी केल्यावर विमाधारकाला अनेक फायदे मिळतात. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, कायमस्वरूपी, तात्पुरते किंवा अंशतः अपंगत्व आल्यास, नातेवाईकांना एकरकमी रक्कम या विम्या अंतर्गत दिली जाते. याशिवाय बऱ्याशाच कंपन्या विम्यासोबत अतिरिक्त सुविधाही देतात. उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आलेला खर्च आणि अपघातातून अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई म्हणून ठराविक रक्कम दिली जाते.

अनेक विमा कंपन्या ठराविक कालावधीसाठी रोख भत्ता देखील देतात. तसेच या विम्या अंतर्गत अंत्यसंस्काराचा खर्चही देण्यात येतो. योग्य पॉलिसीची निवड केल्यास, विमा कंपनी विमाधारकाचा EMI देखील भरण्यासाठी मदत करते.

कोणता खर्च यामध्ये समाविष्ट नाही

दंगलीमुळे झालेली दुखापत, युद्धामुळे झालेली कोणतीही दुखापत किंवा मृत्यू तसेच जन्मजात अपंगत्व या गोष्टींसाठी येणारा खर्च या विम्या अंतर्गत कव्हर केला जात नाही. तसेच खेळांमध्ये झालेली दुखापत किंवा अपघात यासाठी आलेला खर्च यामध्ये समाविष्ट होत नाही. विमाधारक नशेच्या अवस्थेत अपघाताला बळी पडला, तर त्याच्या कुटुंबियांना विम्याच्या रकमेचा लाभ घेता येत नाही.

Source: hindi.news18.com