Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Two Factor Authentication सेवेसाठी शुल्क भरा नाहीतर 20 मार्चनंतर तुमच्या खात्याची सुरक्षितता बंद!

Pay for Twitter Two Factor Authentication

Twitter Two Factor Authentication: पूर्वी ट्विटर वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सेवा मोफत मिळत होती. पण ट्विटरने ही सेवा सिमित करून त्याचा लाभ आता फक्त ब्ल्यू टीक सब्सक्रायबर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे. 20 मार्चपासून Two Factor Authentication (2FA) ची सेवा फक्त ब्ल्यू टीक सब्सक्रायबर्सना दिली जाणार आहे.

ट्विटरने गेल्या महिन्यात घोषणा केल्याप्रमाणे फ्री आणि ब्ल्यू टीक सब्सक्रायबर्स यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यास सुरुवात केली. पूर्वी ट्विटर वापरणाऱ्या सर्व ग्राहकांना टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सेवा मोफत मिळत होती. पण ट्विटरने ही सेवा सिमित करून त्याचा लाभ आता फक्त ब्ल्यू टीक सब्सक्रायबर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे. 20 मार्चपासून Two Factor Authentication (2FA) ची सेवा फक्त  ब्ल्यू टीक सब्सक्रायबर्सना दिली जाणार आहे.

ट्विटरने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. अर्थात हे बदल इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेण्याची तयारी दर्शवल्यापासून सुरू आहेत. त्यात मस्कने ट्विटरची मालकी स्वीकारल्यानंतर तर खूपच बदल झाले. यामध्ये बिझनेस स्ट्रॅटेजीला धरून बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ट्विटरने फेब्रुवारी महिन्यात Two Factor Authentication बाबत मोठे बदल करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार, 20 मार्चनंतर ट्वीटरचे खाते असणाऱ्या ग्राहकांना टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सेवा घेण्यासाठी ब्ल्यू टीक सब्सक्रायबर्सची सेवा घ्यावी लागेल. म्हणजेच ट्वीटर खातेधारकांना थेट पैसे मोजूनच टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सेवा मिळणार आहे. Two Factor Authentication हे सोशल मिडियावरील खाते सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाणारी सिस्टिम आहे. ती पूर्वी ट्विटरसह सर्व सोशल मिडियासाठी मोफत वापरली जात होती. त्यासाठी ट्वीटर आता पैसे घेणार आहे.

ज्या ट्विटर खातेधारकांकडे ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन नाही, त्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आतापर्यंत Two Factor Authenticationची सेवा मोफत मिळत होती. ती 19 मार्चनंतर डी-अॅक्टीवेट होणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता निघून जाणार आहे. तुम्ही ती हवी असेल तर त्यासाठी ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शनची सेवा पैसे भरून घ्यावी लागणार.

Two Factor Authenticationसाठी किती शुल्क भरावे लागणार?

ट्विटरने जाहीर केल्याप्रमाणे एसएमएसवर आधारित Two Factor Authentication सेवा घेण्यासाठी ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे आणि ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शनसाठी 8 डॉलर म्हणजे सुमारे 650 रुपये प्रत्येक महिन्याला भरावे लागणार आहेत. ज्यांनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची सेवा घेतलेली आहे. त्यांना ती सुरू राहण्यासाठी 650 रुपये भरून ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शनची सेवा घ्यावी लागणार आणि ज्यांना पैसे भरायचे नाहीत. त्यांनी ही सेवा डिसेबल करावी लागणार.

2FA ची सेटिंग कशी बदलायची?

ट्विटर खात्यातील सेटिंगमध्ये Security and account accessमध्ये क्लिक करा. त्यानंतर Securityमध्ये जाऊन Two Factor Authentication यावर जा. ही सेवा वापरण्याबद्दल किंवा त्यात तुम्हाला हवे असलेले बदल करण्याची पर्याय दिलेले आहेत. त्याचा वापर करून तुम्ही ट्विटरच्या 2FA सेटिंगमध्ये बदल करू शकता.

पण एखाद्या खातेधारकाने ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन घेतले नाही किंवा 2FAची पण डिसेबल केली नाही तर काय होईल? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर अशा खातेधारकांची 2FAची सेवा आपोआप बंद होणार आणि त्यानंतर त्यांचे खाते पूर्वीसारखे सुरक्षित राहणार नाही. त्याची जबाबदारी खातेधारकाचीच राहणार.