Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Park Hotel IPO आणण्याच्या तयारीत; 1050 कोटी रुपये उभारण्याचा मानस, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

Park Hotel IPO

Image Source : www.theparkhotels.com

Apeejay Surrendra Park Hotel IPO: भारतातील एक मोठी हॉटेल चैन पार्क हॉटेल लिमिटेड कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1050 कोटी रुपये जमा करणार आहे. ही आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे.

Park Hotel IPO: हॉटेल चैन पार्क हॉटेलने (Apeejay Surrendra Park Hotel Ltd.) आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली असून, कंपनीचा या आयपीओच्या माध्यमातून 1050 कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. तसेच कंपनीने यातून 650 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या प्रवर्तकांनी 400 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलमधून (Offer for Sale-OFS) करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही आणखी एक चांगली संधी ठरू शकते. भारतातील हॉटेलिंगचा व्यवसाय वाढत असल्यामुळे गुंतवणूकदारांकडून या आपीओला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. पार्क हॉटेलच्या आयपीओसाठी जेएम फायनान्शिअल, अॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरीटीज लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल लिमिटेड कंपनी The Park या ब्रॅण्डसहित हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. सध्या या कंपनीमध्ये प्रवर्तक आणि इतर सदस्यांजवळ कंपनीतील 94.18 टक्के भागीदारी आहे. त्याशिवाय इतर दोन गुंतवणूकदारांजवळ 5.82 टक्के हिस्सा आहे. ऑफर फॉर सेलमधून प्रवर्तक एपीजे सुरेंद्र ट्रस्ट 80 कोटी आणि एपीजे प्रायव्हेट लिमिटेड 296 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. इतर प्रवर्तकांमध्येआरईसीपी IV पार्क हॉटेल इन्वेस्टर्स आणि आरईसीपी-4 पार्क को-इन्वेस्टर्स सहभागी आहेत.

पार्क हॉटेल ग्रुप

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्सच्या भारतातील उद्योगामध्ये जवळपास 8 मोठ्या कंपन्या सहभागी आहेत. या ग्रुपअंतर्गत कंपनी द पार्क, द पार्क कलेक्शन, जोन बाय पार्क आणि इतर हॉस्पिटॅलिटी उद्योगांचे कामकाज चालवले. कंपनीला या क्षेत्रातला जवळपास 5 दशकांचा अनुभव आहे. सध्या कंपनीद्वारे लक्झरी आणि मिडल कॅटेगरीमधील जवळपास 27 हॉटेल्सचे काम चालते. मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या अंतर्गत 80 रेस्तराँ, नाईट क्लब आणि बार कार्यरत आहेत. 2023 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 524 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. तर या वर्षात कंपनीला 48 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.