Vitthal Mandir Pandhrpur: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा विकास आराखडा (Temple Development Plan) तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने या मंदिराच्या विकासासाठी 73 कोटी 85 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. या विकास आराखड्यास गुरूवारी अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून विठ्ठल मंदिर (Vitthal Mandir)आणि परिसराचे संवर्धन आणि विकास केला जाणार आहे.
शासन निर्णय बदलला-
पंढरपूर(Pandharpur) येथील विठ्ठ्ल मंदिराच्या विकास आराखड्याचा निर्णय घेताना 19 जुलै 2016 च्या शासन निर्णयाचा अडथळा होता. त्या निर्णयानुसार तीर्थक्षेत्राच्या आराखड्याची कमाल किंमत मर्यादा ही 25 कोटी इतकी होती. दरम्यान राज्यशासनाने ही अट शिथिल केली आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय काढून पंढरपूर देवस्थान मंदिराच्या 73 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विकास आराखडा - Vitthal mandir development
पंढरपूर हे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी पंढरपुरात सुमारे साडेतीन कोटी भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. भाविकांची वाढती संख्या पाहता या ठिकाणी अनेक सोयी सुविधा देणे गरजेचे होते. त्याच बरोबर विठ्ठल मंदिरांचे जतन संवर्धन करण्याचीही मागणी केली जात होती. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने अखेर विठ्ठल मंदिर विकास आराखड्याला मंजुरी दिली. यासाठी 73कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील पुढील विविध कामांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
निधीची तरतूद- Fund for Temple development plan
- मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबी, सोळखांबी अर्ध मंडप इ.) जतन संवर्धनासाठी- 05,03,58,000
- रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन - 02,70,53,000
- नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण -05,05,51,974 रुपये
- महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळी विकास- 06,18,23,000 रुपये
- लाकडी सभामंडप 01,25,00,721 रुपये
- महालक्ष्मी मंदिर,व्यंकटेश मंदिर व मंदिरातील इतर इमारती जतन,संवर्धन - 03,69,07,000 रुपये
- बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा, काशी विश्वेश्वर,शनेश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर इत्यादी विकास
- मुख्य मंदिर समूहाच्या बाहेरील 28 परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन- 11,27,00,000 रुपये.
- विद्युत व्यवस्थापनासाठी - 05,67,11,980 रुपये
- जल व्यवस्थापन(पिण्याचे पाणी, सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन)-01,54,08,000 रुपये
- अभ्यागत सुविधेसाठी - 06,68,98,877 रुपये
- मंदिरालगतच्या रस्त्याची दगडी फरसबंदी आणि सौंदर्यीकरण -04,20,72,960 रुपये
- जीएसटी सह अन्य करांसाठी - 20,33,81,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
31 मार्च 2025 पर्यंत मूदत-
राज्य शासनाने विठ्ठल मंदिर विकास आराखड्यास 22 जूनला 2023 ला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर प्रत्यक्षात या विकास आराखड्यानुसार पंढरपूरातील प्रस्तावित कामे दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहेत. या विकास आरखड्यआराखड्यातीली टप्प्यातील कामे ही दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी-
विठ्ठ्ल मंदिर विकास आराखड्याअंतर्गत कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी शासनाच्या काही परवान्या घेण्या आवश्यक आहेत. त्या परवानगी घेणे, विकास कामांना तांत्रिक मान्यता घेणे, निधी वितरण करणे याबाबतची जबाबदारी ही सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.