Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adventure Sports Insurance : साहसी ट्रेकर्ससाठी भारतात फक्त 2 कंपन्यांकडून मिळते विमा संरक्षण

Adventure Sports Insurance : साहसी ट्रेकर्ससाठी भारतात फक्त 2 कंपन्यांकडून मिळते विमा संरक्षण

साहसी क्रीडा प्रकार अनेकांना आवडतो, पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, ट्रेकिंग,बंजी जंपिंग, राफ्टिंग या सारखे अनेक साहसी क्रीडा ( Adventure Sports) प्रकार अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते आणि अनेकजण ती इच्छा पूर्णही करतात. यामध्ये जितका आनंद आहे तितकाच धोका देखील आहे, अशा धोक्यांसाठी भारतात विमा संरक्षण मिळते का? याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

साहसी क्रीडा प्रकार अनेकांना आवडतो, पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, ट्रेकिंग,बंजी जंपिंग, राफ्टिंग या सारखे अनेक साहसी क्रीडा ( Adventure Sports) प्रकार अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते आणि अनेकजण ती इच्छा पूर्णही करतात. यामध्ये जितका आनंद आहे तितकाच धोका देखील आहे. अशा प्रकारचे साहसी खेळ करणार्‍याला प्रत्येकाला माहिती असते, आपण जीव धोक्यात घालून हे सर्व करत आहोत. दरम्यान, मग अशा प्रकारच्या खेळासाठी भारतात विमा(Insurance) कंपन्यांकडून संरक्षण दिले जाते का? किंवा किती कंपन्या अशा प्रकारच्या साहसी खेळासाठी विमा संरक्षण  (Adventure Sports Insurance) प्रदान करतात. याबाबतची माहिती आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.              

खोल समुद्राच्या तळाशी जाणे किंवा पॅराग्लायडिंग, राफ्टिंग असे साहसी क्रीडा प्रकार करताना दुर्घटना होऊ शकतात. जसे की समुद्राच्या तळाशी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा विध्वंस झाला आणि त्यामध्ये 5 नागरिकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे हे धोके माहीत असतानाही काही लोक ते धाडस करतात आणि त्याचा आनंद घेतात. मात्र, या धोक्याच्या खेळांसाठी भारतात विमा संरक्षण मिळते का? किंवा कोणकोणत्या कंपन्या या सुविधा देतात याबाबतची माहिती आपण पाहूयात.              

जीवितहानी होण्याची जोखीम जास्त               

जून 2016 पर्यंत साहसी क्रीडाप्रेमींची सुरक्षितता आणि भविष्यातील संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी  कोणत्याही विमा कंपनीकडून विमा कवच दिले जात नव्हते. यातील दुखापती आणि जीवितहानी होण्याच्या उच्च जोखमीमुळे विमा कंपन्या अशा प्रकारचा विमा संरक्षण देण्यास इच्छुक नसतात. भारतातील वेगवेगळ्या विमा कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसीमध्ये साहसी पर्यटन अशा उच्च जोखमीच्या घटकांचा समावेश करू शकतात. परंतु या पॉलिसी पर्यटन विमा, आरोग्य विमा अथवा अपघात विमा  या सारख्या श्रेणीमध्ये येऊ शकतात.   

साहसी खेळांसाठी या दोन कंपन्या देतात विमा संरक्षण

भारतात काही मोजक्याच कंपन्यांकडून साहसी खेळासाठी विमा संरक्षण दिले जाते. त्यामध्ये बजाज आलियान्झ (Bajaj Allianz) जनरल इन्शुरन्स आणि गो डिजिट जनरल (Go Digit General Insurance या दोन आघाडीच्या कंपन्या अशा प्रकारच्या विमा सुरक्षेची सुविधा प्रदान करतात. बजाज अलियान्झ ही भारतातील मोठी विमा कंपनी आहे जी विशेषत: साहसी खेळांसाठी विमा कवच प्रदान करते. बजाजच्या विमा संरक्षणामध्ये अपघातग्रस्त ग्राहकाला रुग्णालयात दाखल करण्यासह आवश्यक असल्यास एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या खर्च कव्हर करण्याची सुविधा प्रदान करण्यात येते.              

बजाज आलियान्झ अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स विम्याचे अ‍ॅड-ऑन          

बजाज आलियांझ जनरल इंन्सुरन्स कंपनी, पर्सनल अ‍ॅक्सीडेंट प्लान सोबतच'अ‍ॅड-ऑन' अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स कव्हर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. भारतातील बदलती जीवनशैली आणि त्या संबंधित धोके समाविष्ट करण्याच्या दृष्टीने बजाज ने ही विमा सुविधा सुरू केली. ही पॉलिसी परदेशाचा प्रवास करण्यासाठी देखील उपलब्ध आहे. साहसी क्रीडा प्रकार हा व्यक्तिगत दुर्घटना विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट आहे.              

1 कोटी पर्यंतचे विमा सुरक्षा कवच-              

Bajaj Allianz कडून साहसी क्रीडा अ‍ॅड-ऑन हे साहसी खेळांमध्ये भाग घेत असताना अपघाताचा धोका कव्हर करण्यासाठी एकरकमी लाभाची पॉलिसी आहे. यामध्ये 1 कोटी रुपयांपर्यंत विमा कव्हर केला जातो. ज्यात व्यक्तीचा मृत्यू किंवा कोणत्याही कायमस्वरूपी अपंगत्वाचा विमा समाविष्ट आहे. जनरल विमा सुरक्षा कवच अंतर्गत अॅडव्हेंचर स्पोर्ट्स विमा देखील कव्हर केला जातो. अ‍ॅड-ऑन योजना तुमच्या बेस कव्हरशी संबंधित आहे. साहसी क्रीडा प्रकारच्या जोखमीच्या कृती दरम्यान तुम्हाला मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्ही विमा राशीतील 25%, 50% या 100% रक्कमेचा लाभ घेऊ शकता, बजाज आलियान्झ तुम्हाला एक कोटी पर्यंतचा विमा सुरक्षा कवच प्रदान करते.              

गो डिजिट इन्शुरन्सचा विमा- GO Digit Insurance              

बजाज व्यतिरिक्त,गो डिजिट इन्शुरन्सची (GO Digit Insurance) आंतरराष्ट्रीय प्रवास विमा पॉलिसी आहे. त्यांच्या या पॉलिसीमध्ये एक दिवसासाठी साहसी क्रीडा विमा सुविधा कव्हर केली जाते. त्याअंतर्गत, परदेश दौऱ्यावेळी कोणत्याही साहसी क्रीडा प्रकारातील दुर्घटनेमुळे उद्भवणारे कोणतेही हॉस्पिटलायझेशन किंवा ओपीडी उपचाराचा खर्च कव्हर केला जातो. मात्र असा साहसी क्रीडा प्रकार एक दिवसाचाच असायला हवा. उदा., घोडेस्वारी, स्कायडायव्हिंग, स्कूबा डायव्हिंग, सर्फिंग, स्कीइंग, बंजी जंपिंग, रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग इ. यासारख्या क्रियाकलापांचा या विमा सुरक्षेमध्ये समावेश आहे.