एलआयसीच्या कोणत्याही प्लॅनमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला त्यावर चांगलाच रिटर्न मिळतो. आता एलआयसीने एलआयसी आधार शिला प्लॅन आणला आहे. हा फक्त महिलांच्या गरजा पाहून डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी फक्त 87 रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीवेळी मोठी रक्कम मिळायला मदत होणार आहे. तसेच, या प्लॅनद्वारे सेव्हिंग्ज आणि इन्शुरन्स या दोन्हींचा लाभ घेता येणार आहे.
Table of contents [Show]
महिलांना होणार फायदा
एलआयसी आधार शिला प्लॅन हा एंडोमेंट प्लॅन असून याद्वारे सेव्हिंग्ज आणि इन्शुरन्स कव्हरचा लाभ घेता येणार आहे. तसेच ही वैयक्तिक लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. पाॅलिसी टर्मदरम्यान पाॅलिसी धारकाचा अकाली मृत्यू झाल्यास, कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळायला मदत होणार. तसेच, पाॅलिसी धारक प्लॅनच्या मुदतीपर्यंत टिकल्यास, म्यॅच्युरिटीवेळी धारकाला पूर्ण बेनिफिट्स मिळणार आहेत. याशिवाय, पाॅलिसीद्वारे लोन सुविधा आणि वाहन इन्शुरन्सचा ही पर्याय सामील करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना याचा लाभ घेऊन लिक्वीडिटीच्या गरजा पूर्ण करता येणार आहेत.
प्लॅनसाठी पात्रता
प्लॅनच्या नावातच थोडक्यात प्लॅनचा अंदाजा येतो. एलआयसी आधार शिला प्लॅन हा महिलांसाठीच बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ही पाॅलिसी तुम्ही 10 वर्ष ते 20 वर्षांच्या मुदतीसाठी खरेदी करु शकता. ही पाॅलिसी 8 वर्ष ते 55 वर्ष वयांच्या सर्व महिलांसाठी आहे. तर मॅच्युरिटीवेळी महिलेचे जास्तीतजास्त वय 70 वर्ष असू शकते. तुम्ही जवळच्या एलआयसीच्या शाखेत जाऊन या पाॅलिसीचा लाभ घेऊ शकता.
मॅच्युरिटीवेळी किती मिळतील पैसे?
तुम्हाला या पाॅलिसीद्वारे मोठी रक्कम मिळवायची असल्यास, दिवसाला 87 रुपये गुंतवावे लागणार आहेत. याचाच अर्थ या प्लॅनचा प्रीमियम वर्षाला 31,755 रुपये होईल. तर 10 वर्षात एकूण 3,17,550 रुपये जमा होतील. हेच पैसे जर तुम्ही मॅच्युरिटीवेळी म्हणजे वयाच्या 70 व्या वर्षी काढाल तर तेव्हा तुम्हाला 11 लाखाचा फंड मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्लॅनचा अवधी निवडून त्यानुसार प्रीमियम भरावा लागणार आहे.
हे आहेत फायदे
- पॉलिसीची मुदत संपल्यानंतर रिम्बर्समेंटचा लाभ मिळतो.
- पाॅलिसीदरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.
- विशिष्ट अटींसाठी पॉलिसी सरेंडरचा पर्याय निवडता येतो आणि सरेंडर बेनिफिटचा लाभ ही घेता येतो.
- तुम्ही सेव्हिंग्ज वाढवण्यासाठी लॉयल्टी एडिशनचा फायदा घेऊ शकता.
- पॉलिसीच्या मूल्यावर आधारित लोन सुविधा मिळवता येते.
- टॅक्सचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
- तुमच्या सोयीनुसार प्रीमियम भरु शकता.