Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NSE Transaction Charges: 'NSE'चा गुंतवणूकदारांना दिलासा, 1 एप्रिलपासून ट्रेडिंगवरील चार्जेस कमी होणार

NSE Charges

Image Source : www.bloomberg.com

NSE Transaction Charges: राष्ट्रीय शेअर बाजाराने इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील 6% शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्क पूर्वी प्रमाणे 4% इतके राहील, असे 'एनएसई'ने (NSE) म्हटले आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराने इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील 6% शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 1 एप्रिल 2023 पासून   इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील शुल्क पूर्वी प्रमाणे 4% इतके राहील, असे 'एनएसई'ने (NSE) म्हटले आहे.|

इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्टमधील (NSE IPFT) निधी वाढवण्यासाठी एनएसईने जानेवारी 2021 मध्ये इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हजमधील ट्रेडिंगचे शुल्क 6% इतके वाढवले होते.मात्र या ट्रस्टमधील आर्थिक योगदानाचा फेर आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार इक्विटीसाठी योगदान 10 कोटी इतके करण्यात आले असून फ्युचर्ससाठी 0.01 प्रती कोटी आणि इक्विटी ऑप्शन्ससाठी 50 कोटी इतके करण्यात आले असल्याचे एनएसईने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गुंतवणूकादांच्या दाव्यांची पूर्तता करता यावी यासाठी एनएसईने इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्टची स्थापना केली आहे. एखाद्या घोटाळ्यात किंवा आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात गुंतवणूकदारांना पूर्ण भरपाई मिळावी हा फंडाचा उद्देश आहे. या फंडावर विश्वस्त देखरेख ठेवतात. तसेच गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी,  संचालक मंडळाचे सदस्य आणि एनएसईमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ट्रस्टवर समावेश आहे.

दरम्यान, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्टमध्ये आता पुरेसा निधी जमा झाल्याने एनएसईने शुल्कवाढ मागे घेतली आहे. इक्विटी कॅश आणि डेरिव्हेटिव्हज व्यवहारांवरील 6% शुल्क येत्या 1 एप्रिल 2023 पासून कमी करण्यात येणार आहे. त्याऐवजी 4% आकारले जाईल, असे एनएसईने म्हटले आहे.

NSE मधील ट्रेडिंगवर आकारले जातात हे चार्जेस

सेबी टर्नओव्हर फी  (SEBI Turnover Fees)

डेट सिक्युरिटीज वगळता सर्व प्रकारच्या खरेदी आणि विक्रीवर 0.00015%  सेबी टर्नओव्हर फी आकारली जाते.हे शुल्क 1 कोटी रुपयांना 15 रुपये इतके आहे. 
डेट सिक्युटीजमधील प्रत्येक व्यवहारावर 0.000005% इतके शुल्क आकारले जाते. हे प्रमाण 1 कोटी रुपयांना 5 रुपये इतके आहे.

स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty Charges)

शेअर्स ट्रान्सफरवर स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. देशभरात प्रत्येक राज्यात स्टॅम्प ड्युटी वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटीचा दर पुढील प्रमाणे आहे. नॉन डिलिव्हरी ट्रेडसाठी 0.002% स्टॅम्प ड्युटी आहे. डिलिव्हरी ट्रेडसाठी 0.01% स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते.

सर्व्हिस टॅक्स (Service Tax)

स्टॉक ब्रोकर्सला ब्रोकिंग सेवा देण्यासाठी 18% सेवा कर (जीएसटी) द्यावा लागतो.

सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) 

शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर गुंतवणूकदारांना सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) द्यावा लागतो. 1 जून 2016 मध्ये एसटीटी करात सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार यात इक्विटी  ट्रेड, फ्युचर्स अॅंड ऑप्शन्स, ट्रान्सफर ऑफ शेअर्स अशा व्यवहारांवर 0.10% ते  0.100%  असा एसटीटी कर वेगवेगळ्या व्यवहारांनुसार आकारला जातो.

NSE चे सभासद होण्यासाठी लागतात इतके चार्जेस

राष्ट्रीय शेअर बाजाराचा सभासद होण्यासाठी (NSE Membership) लाखो रुपये शुल्क 'एनएसई'कडून आकारले जाते. यात सर्वच सेगमेंटमध्ये मेम्बरशिपसाठी 500000 रुपये अधिक कर अशी मोठी रक्कम भरावी लागतो. केवळ डेट सेगमेंटची मेंम्बरशिप मिळवण्यासाठी 100000 रुपये अधिक कर असे शुल्क भरावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेसाठी  10000 रुपये अधिक कर अशी प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागते.  

(News Source : Economic Times, nseindia.com)