• 27 Mar, 2023 06:35

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Enterprises: अदानी समूहासाठी गुड न्यूज! एक महिन्यानंतर अदानी स्टॉक्स NSE च्या निगराणीतून बाहेर

NSE surveillance framework

गुंतवणुकदारांच्या हिताचे रक्षण करण्यााठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून संवेदनशील कंपन्यांचे शेअर्स निगराणी यादीत ठेवले जातात. या यादीतील कंपन्यांच्या शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर NSE ने अदानी एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स surveillance यादीतून वगळले आहे.

हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. अचानक कधी शेअर्स कोसळतात तर कधी वर जात आहेत. एकूणच अदानी कंपन्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. गुंतवणुकदारांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अदानी कंपन्यांसाठी एक गुड न्यूज मिळाली आहे. हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) ने अदानी एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स निगराणी यादीतून वगळले आहे. 

काय आहे सर्व्हायलन्स मेजर फ्रेमवर्क (what is surveillance measure framework)

गुंतवणुकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून संवेदनशील कंपन्यांचे शेअर्स निगराणी यादीत ठेवले जातात. म्हणजेच त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. या फ्रेमवर्कला additional surveillance measure (ASM) framework असे म्हटले जाते. अदानी शेअर्समध्ये फेरफार आणि समूहातील कंपन्यांमध्ये लेखा विषयक घोटाळे होत असल्याचे आरोप हिंडेनबर्ग या अमेरिका स्थित कंपनीने केल्यानंतर अदानी शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली होती. गुंतवणूकदार अदानी ग्रुप कंपन्यांमधून पैसे काढून घेते होते. त्यामुळे या शेअर्सवर NSE कडून नजर ठेवण्यात येत होती.

आज बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजार(NSE) ने अदानी एंटप्राइजेस आणि इतर दोन कंपन्यांना  surveillance यादीतून वगळले. याबाबत अधिकृत पत्रक NSE ने काढले आहे. अचानक शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होण्यापासून रोखण्यासाठी NSE ने हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर पावले उचलली होती. दरम्यान, या आरोपानंतर अदानी समूहातील कंपन्यांनी कर्ज फेडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य वाढले आहे. मात्र, अद्यापही किंमतींमध्ये अस्थिरता आहे. 

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग संस्थेने वादग्रस्त अहवाल जाहीर केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे 50% बाजारमुल्य काही अवधीत नाहीसे झाले. गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ उडाला. गौतम अदानी यांचे श्रीमंतांच्या यादीतील स्थानही खाली आले. 3 फेब्रुवारी रोजी NSE ने अदानी एंटरप्राइजेस आणि अदानी पोर्ट्स या दोन कंपन्यांचा समावेश निगराणी यादीत केला होता. त्यातील अदानी पोर्ट्स ही कंपनी आधीच यादीतून हटवण्यात आली होती. आता अदानी एंटरप्राइजेस ही कंपनीसुद्धा या यादीतून हटवण्यात आली आहे.

GQG संस्थेची अदानी समूहात गुंतवणूक 

अदानी समूहामध्ये मागील आठवड्यात GQG Partners या गुंतवणूक फर्मने 15 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या ग्लोबल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीची गुंतवणूक अदानी समूहासाठी टर्निंग पॉइंट ठरत आहे. GQG पार्टनर्स कंपनीने अदानी एंटरप्राइजेसमध्ये 3.4% शेअर्स विकत घेतले आहेत. तर अदानी पोर्ट्समध्ये 4.1%, अदानी ट्रान्समिशनमध्ये 2.5%, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीत 3.5% शेअर्स विकत घेतले आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांत अदानी समूहातील शेअर्सचे मूल्य 66% वाढले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूह आणि हिंडेनबर्ग अहवालाशी संबंधित विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती दोन महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करणार आहे.