सुरुवातीच्या काळात नोकिया ही मोबाईल बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी मानली जात होती. पण काही वर्षांपूर्वी अॅण्ड्रॉइडच्या आगमनामुळे नोकिया कंपनीला उतरती कळा लागली. अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची क्रेझ आणि त्याचा वाढता वापर हे याचे प्रमुख कारण मानले जाते. पण आता पुन्हा एकदा नोकिया स्मार्टफोन बाजारपेठेत पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. कंपनी 'XR 30' या दमदार स्मार्टफोनसह लवकरच स्मार्टफोन बाजारपेठेत उतरत आहे. कंपनीने या स्मार्टफोनची घोषणा जुलै 2021 मध्ये केली होती. 2023 मध्ये हा स्मार्टफोन Nokia Sentry 5G या नावाने लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्सवरून असे दिसून येते की, कंपनी आपली हरवलेली ओळख पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. XR सिरीज अंतर्गत या स्मार्टफोनचा समावेश असणार आहे.
नोकिया XR30चे डिझाईन लॉन्चिंगपूर्वीच लीक
वर्षभरापूर्वी, एका टेक युट्युबरने पोस्ट केलेल्या व्हिडिओत या नोकिया स्मार्टफोनचा फर्स्ट लूक लीक झाला होता. या व्हिडिओत स्मार्टफोनची गुणवत्ता व स्पेसिफिकेशन्स याबद्दल सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. लीक झालेल्या रेंडर डिझाईननुसार मोबाईलच्या मागील बाजूस असलेली कॅमेऱ्याची रचना व संपूर्ण डिझाईन लॉन्चपूर्वीच ग्राहकांना बघायला मिळाली होती.
नोकिया आता स्वतंत्र "XR" या कॅमेरा ब्रॅण्डिंगचा वापर करणार आहे. जर्मन कंपनी Zeiss सोबतची भागीदारी रद्द झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. तसेच या स्मार्टफोनचे डिझाईन यापूर्वी लॉन्च झालेल्या XR मालिकेतील स्मार्टफोन्स सारखेच आहे. तसेच या फोनमध्ये गोरिला ग्लास व वॉटरप्रूफींग हे फीचर्स दिले आहेत.
नोकिया XR30 स्पेसिफिकेशन्स
Nokia XR30 हा कॅमेरा केंद्रित स्मार्टफोन असेल. यात 64 मेगापिक्सल मुख्य कॅमेरासह आठ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा असणार आहे. या बॅक कॅमेरा सेटअप शिवाय यामध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 6GB RAM रॅम व 128GB इंटरनल स्टोरेज, 33W चार्जिंगसह 4,600mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 40 हजार रुपये इतकी असणार आहे.