Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nokia Mobiles: नोकियाने लाँच केले परवडणाऱ्या किमतीतले मोबाईल, घरबसल्या रिपेयर करता येणार मोबाईल!

Nokia

Image Source : www.theguardian.com

Nokia Smartphone यूजर घरबसल्या या फोनचा डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट, बॅटरी आणि पॅनल फिक्स करू शकतात.कंपनीचा दावा आहे की यूजरला G22 मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी 5 मिनिटे आणि डिस्प्ले बदलण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतील.

नोकिया मोबाईलची निर्मिती करणाऱ्या HMD Global कंपनीने एकाच वेळी तीन बजेट 4G स्मार्टफोन Nokia G22, Nokia C32, Nokia C22 भारतात लॉन्च केले आहेत. G22 हँडसेट रिपेअर करण्यासाठी एकदम सोपा स्मार्टफोन म्हणून सादर करण्यात आला आहे. मोबाइल वापरकर्ते हा मोबाईल स्वत: घरच्या घरी दुरुस्त करू शकणार आहेत हे विशेष. मोबाईलचे मागील आवरण 100% रिसायकल करता येणाऱ्या प्लास्टिकपासून बनविलेले आहे, त्यामुळे सहज त्याची दुरुस्ती करता येणार आहे.

यूजर घरी बसल्या बसल्या या फोनचा डिस्प्ले, चार्जिंग पोर्ट, बॅटरी आणि पॅनल फिक्स करू शकतात. कंपनी यासाठी iFixit किट देखील देणार आहे. HMD आणि ifixit यांच्यातील भागीदारीमुळे जागतिक स्तरावर दुरुस्ती मार्गदर्शक आणि परवडणारे मोबाईलचे भाग त्वरित उपलब्ध होणार आहेत. कंपनीचा दावा आहे की यूजरला G22 मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी 5 मिनिटे आणि डिस्प्ले बदलण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतील.

Nokia G22, C32, C22 मोबाईलची किंमत

Nokia G22 4GB + 64GB व्हेरिएंटची जागतिक बाजारात किंमत 179 युरोपासून सुरू होते. भारतीय बाजारात फोनची किंमत सुमारे 15,700 रुपये असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, C32 च्या 3GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 139 युरोपासून सुरू होते. भारतीय बाजारात त्याची किंमत 12,200 रुपये असू शकते. Nokia C22 च्या 2GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 129 युरोपासून सुरू होते. भारतात या फोनची किंमत अंदाजे 11,500 रुपये इतकी असेल.

नोकिया G22 तपशील

Nokia G22 फोनमध्ये 720 x 1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल स्मार्टफोनचा रिफ्रेश दर (Refresh Time) 90Hz आहे आणि 500nits ब्राइटनेसला (Brightness) सपोर्ट करतो. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 (corning gorilla glass 3) डिस्प्ले संरक्षणासाठी देण्यात आला आहे.

LED फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा (Rear Camera) सेटअप स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा (Primary Camera) , 2MP मायक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा (Front Camera) देण्यात आला आहे. Nokia G22 Android 12 ऑपरेटिंग सिस्टम (OS) वर काम करतो. हँडसेट प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीमवर 2 वर्षांची वॉरंटी आणि मासिक सुरक्षा अपडेटवर 3 वर्षांची वॉरंटी देत आहे.

फोनमध्ये Unisoc T606 Octacore प्रोसेसर देण्यात आला आहे जो 1.6 GHz क्लॉक स्पीडवर चालतो. त्याच वेळी, ग्राफिक्ससाठी फोन Mali G57 GPU ला सपोर्ट करतो. Nokia G22 2GB व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे ते 6GB RAM चा युजर्स अनुभव घेऊ शकणार आहेत. फोनमध्ये 5050 mAh बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षिततेसाठी, स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर सेन्सर आहे. फोन IP52 रेटेड आहे ज्यामुळे तो वॉटर आणि डस्ट प्रूफ (Water and Dust Proof) आहे. नोकिया G22 मध्ये 3.5mm जॅक, FM रेडिओ आणि NFC सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.
हा नोकिया फोन Meteor Grey आणि Lagoon Blue रंगात उपलब्ध आहे.

नोकिया C22 आणि C32 नोकिया तपशील

व्हेरिएंट आणि कलर ऑप्शन (Varient and Color Option): Nokia C22 2 GB RAM + 64 GB स्टोरेज आणि 3 GB RAM + 64 GB स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि सँड कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Nokia C32 3 GB RAM + 64 GB स्टोरेज आणि 4 GB RAM + 128 GB स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये देखील उपलब्ध आहे. हा फोन चारकोल, ऑटम ग्रीन आणि बीच पिंक कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

डिस्प्ले (Display): नोकिया C22 आणि C32 दोन्ही स्मार्टफोन्स कॉर्निंग गोरिल्ला ग्लासद्वारे संरक्षित 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD+ डिस्प्लेसह येतात. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी, नोकियाचे हे मोबाइल फोन IP52 रेटिंगने सुसज्ज आहेत.

कॅमेरा (Camera): दोन्ही नोकिया फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. Nokia C22 मध्ये 13MP चा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याच वेळी, Nokia C32 50MP चा प्राथमिक सेन्सर उपलब्ध आहे. याशिवाय 2MP मायक्रो लेन्स आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर आणि प्रोसेसर (Software and Processor): दोन्ही Nokia फोन Android 13 'Go' आवृत्तीवर काम करतात. यामध्ये गुगल गो अॅप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करता येतात. प्रोसेसिंगसाठी Nokia C22 आणि C32 मध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जर (Battery and Charger): दोन्ही ड्युअल सिम फोन आहेत आणि 4G ला सपोर्ट करतात. पॉवर बॅकअपसाठी, यात 5000 mAh बॅटरी आहे जी 10W चार्जिंगसह कार्य करते.

सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी (Safety and Connectivity) : फिंगरप्रिंट सेन्सर Nokia C22 च्या मागील पॅनलवर ठेवलेला आहे आणि C32 च्या बाजूच्या पॅनलवर आहे. या मोबाईल फोन्समध्ये 3.5mm जॅक आणि FM रेडिओ सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.

60 वर्षांनी नोकियाने बदलला लोगो 


नोकिया (NOKIA.HE) ने रविवारी, 26 फेब्रुवारी रोजी आपली ‘ब्रँड’ ओळख असलेला लोगो बदलला. गेल्या 60 वर्षांमध्ये प्रथमच नवीन लोगोसह नोकिया बाजारात उतरणार आहे. येत्या काळात केवळ मोबाईल निर्मिती उद्योगावर मर्यादित न राहता दूरसंचार उपकरणे देखील बनविण्याचा कंपनीचा मानस आहे.

नवीन लोगोमध्ये ‘NOKIA’ हा शब्द बनवणाऱ्या पाच वेगवेगळ्या आकारांचा समावेश आहे. जुन्या लोगोचा आयकॉनिक निळा रंग नव्या लोगोत वगळण्यात आला आहे.