By Sujit Patil14 Mar, 2023 16:003 mins read 99 views
Nitin Kamath Net Worth: शेअर मार्केट म्हटलं की, जोखीम ही आलीच. मात्र याच जोखमीतील खाच खळगे शिकून नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी 25,600 कोटींची झिरोदा (Zerodha) मोठ्या थाटात उभी केली आहे. ही स्टॉक ब्रोकरेज फर्म उभी करे पर्यंतचा त्यांचा प्रवास नक्की कसा होता, जाणून घेऊयात.
कोणताही व्यवसाय हा केवळ पैशाने नाही तर मेहनतीने, जिद्दीने आणि अथक प्रयत्नाने उभा राहतो. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही बिजनेस स्कुलची गरज नसते, असं जिद्दीने संपूर्ण जगाला सांगणाऱ्या कर्नाटकच्या या पट्ट्याने 25,600 कोटींचा व्यवसाय उभा केला आहे. प्रसिद्ध उद्योजक, झिरोदाचा सह-संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ (Zerodha Co-Founder & CEO Nitin Kamath) आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. शेअर मार्केटमधील नामांकित कंपनी झिरोदा ही स्टॉक ब्रोकरेज फर्म म्हणून ओळखली जाते. कोट्यवधींची कंपनी उभी करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या नितीन कामथचा आजपर्यंतचा प्रवास नक्की कसा होता, आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
5 ऑक्टोबर 1979 रोजी कर्नाटकातील शिमोगा (Shimoga) येथील कोकणी कुटुंबात नितीन यांचा जन्म झाला. वडील कॅनरा बँकेत नोकरीला, आई गृहिणी आणि एक छोटासा भाऊ असं त्यांचं छोटंसं कुटुंब होतं. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या नितीन यांनी दयाल पब्लिक स्कुल, शिमोगा (Dayal Public School) येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन या विषयात त्यांनी बंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (Bangalore Institute of Technology) पदवी संपादन केली.
करिअरची सुरुवात
वयाच्या 17 व्या वर्षी नितीन यांनी वडिलांचं ट्रेडिंग अकाउंट हाताळायला सुरुवात केली. ही सुरुवातच खरं तर उद्योजकतेकडे टाकलेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल. इथूनच त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीची आवड लागली. बंगळूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पदवी शिक्षण घेत असताना त्यांची ही आवड आणखी वाढली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी Proprietary Trader म्हणून स्वतःच काम करायला सुरुवात केली. यातून त्यांनी चांगली कमाईही केली, मात्र 2001 मध्ये शेअर मार्केटमधील क्रॅशमुळे त्यांना मोठ्या नुकसानीला समोर जावं लागलं. अशा परिस्थितीत खचून न जाता त्यांनी मनीपाल इन्फोकॉम (Manipal Infocom) या कंपनीत टेलीकॉलर म्हणून जवळपास 4 वर्ष काम केलं. याच ठिकाणी त्यांना त्यांच्या आयुष्यभराचा जोडीदार भेटला आणि काही कालांतराने ते विवाहबंधनात अडकले.
रिलायन्स मनी ब्रोकरेज फर्मची सुरुवात
2006 मध्ये लोकांना व्यावसायिक मार्गदर्शन आणि सल्ला देणारी रिलायन्स मनी ब्रोकरेज फर्म (Reliance Money Brokerage Firm)त्यांनी सुरु केली. यावेळी निखिल कामथ या त्यांच्या छोट्या भावाने त्यांना मदतीचा हात दिला आणि दोन्ही भावांनी मिळून हा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला 10 क्लाईंटचा डेटा हाताळताना सुद्धा त्यांना अनेक समस्यांना समोर जावं लागलं. मात्र लोकांचा विश्वास आणि दोन भावांची मेहनत आणि जिद्द रंग आणू लागली आणि कंपनीचा पसारा वाढत गेला.
झिरोदाची (Zerodha) स्थापना
वाढता कामाचा पसारा लक्षात घेऊन अखेर 2010 मध्ये झिरोदाची (Zerodha) स्थापना करण्यात आली. शेअर मार्केटचा प्रदीर्घ अनुभव, त्यातील ठोकताळे आणि दोन्ही भावांची मेहनत कामी आली. झिरोदाच्या स्थापनेनंतर अनेक लोकांनी पुढाकार घेऊन झिरोदासोबत कामाची सुरुवात केली. लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्यानंतर आजच्या घडीला झिरोदा आघाडीची शेअर बाजारातील स्टॉक ब्रोकरेज फर्म म्हणून ओळखली जात आहे.
www.editorji.com
caknowledge.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार झिरोदा 2010 नंतर प्रचंड वेगाने विकसित झाली आणि विस्तारली. यातून कंपनीचे उत्पन्न कैक पटीने वाढले. यातूनच नितीन आणि निखिल हे व्यावसायिक स्तरावर मोठे होऊन करोडपती झाले. नितीन कामथ यांनी या व्यवसायातून स्वतःची 2023 सालामध्ये $315 मिलियन म्हणजेच भारतीय चलनानुसार 2594 कोटीहून जास्तची संपत्ती कमावली.
caknowledge.com या साईटने नितीन यांना मिळणाऱ्या मासिक आणि वार्षिक वेतनाबद्दलही माहिती दिली आहे. त्यानुसार नितीन यांना महिन्याला $2 मिलियन म्हणजेच भारतीय चलनानुसार 164,77,00000 रुपयांपेक्षा जास्त पगार मिळतो. तर वर्षाला $25 मिलियन म्हणजेच 205 कोटीहून जास्त पगार मिळतो.
नितीन कामथ यांना मिळालेले पुरस्कार
नितीन यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना 2014 मध्ये Emerging Entrepreneur of year आणि Emerging brokerage firm of the year हे दोन्ही पुरस्कार मिळाले. यापैकी Emerging brokerage firm of the year हा पुरस्कार 2015 मध्ये त्यांना पुन्हा मिळाला. 2016 साली इकॉनॉमिक टाईम्सने जाहीर केलेले Startup of the year आणि 10 Indian businessmen to watch out for in 2016 हे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळाले. 2022 मध्ये वयाच्या चाळीशीत उद्योगपती झालेल्या यादीत नितीन आणि निखिल यांचा समावेश करण्यात आला होता. नितीन त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय आहेत. त्याठिकाणी लोक त्यांना शेअर मार्केटसंदर्भातील दैनंदिन प्रश्न विचारतात.
वर्ल्ड बँकेच्या प्रमुखपदी उमेदवारांची शिफारस करण्याची मुदत संपली असून इतर देशांनी कोणत्याही नावाची शिफारस केली नाही. त्यामुळे अजय बंगा यांची निवड निश्चित समजली जाते. प्रतिष्ठित अशा जागतिक बँकेचे प्रमुखपद भुषवण्याचा मान एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला मिळणार आहे. पुण्यातील खडकी कंन्टोनमेंट येथे त्यांचा जन्म झाला आहे.
बनावट आणि भेसळयुक्त औषधे तयार करणाऱ्या 76 कंपन्यांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालायने कारवाई केली आहे. मागील काही दिवासांपूर्वी गांबिया आणि उझबेकिस्तान देशांमध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या मुलांच्या मृत्यूस भारतीय कंपन्यांनी तयार केलेले औषध जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही देशांनी केला होता. त्यानंतर भारत सरकारने बनावट कंपन्यांना शोधण्याचे अभियान राबवले होते.
Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.