Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nifty Trading: निफ्टीवर आता 21 तास ट्रेडिंग चालणार, जाणून घ्या सविस्तर

Nifty

Image Source : www.devdiscourse.com

Nifty Trading: निफ्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 21 तास ट्रे़डिंग करता येणार आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजवर (NSE IX) गिफ्ट निफ्टीमध्ये येत्या 3 जुलै 2023 पासून 21 तासांचे ट्रेडिंग सायकल सुरु होणार आहे.सुरुवातीला एनएसई आयएक्सवर गिफ्ट निफ्टी, गिफ्ट निफ्टी बँक, गिफ्ट निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि गिफ्ट निफ्टी आयटी डेरिव्हेटिव्ह कॉंन्ट्रॅक्ट्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहेत.

निफ्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 21 तास ट्रे़डिंग करता येणार आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजवर (NSE IX) गिफ्ट निफ्टीमध्ये येत्या 3 जुलै 2023 पासून 21 तासांचे ट्रेडिंग सायकल सुरु होणार आहे.सुरुवातीला एनएसई आयएक्सवर गिफ्ट निफ्टी, गिफ्ट निफ्टी बँक, गिफ्ट निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि गिफ्ट निफ्टी आयटी डेरिव्हेटिव्ह कॉंन्ट्रॅक्ट्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहेत. 

सिंगापूर एक्सचेंजमधील एसजीएक्स निफ्टी डेरिव्हेटीव्हज कॉन्ट्रॅक्ट्स एनएसई आयएक्सवर उपलब्ध करण्यात आले आहेत.एनएसई आयएक्सवर हे कॉन्ट्रॅक्ट्स गिफ्ट निफ्टी म्हणून ओळखले जातील. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजवर (NSE IX) आता डॉलरवर आधारित गुंतवणूक करता येईल. यासाठी इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिस सेंटर ऑथोरिटीने (IFSCA) नियमावली तयार केली आहे.

परदेशी कंपन्यांना भारतात सुलभपणे व्यवसाय करता यावा, यासाठी इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिस सेंटर ऑथोरिटीने (IFSCA) एक खि़डकी योजना सुरु केली आहे. परदेशी गुंतणूकदारांना किंवा कंपन्यांना या माध्यमातून आवश्यक परवानगी दिली जाते.  

गिफ्ट निफ्टीचे ट्रेडिंग सुरु करण्यासाठी एनएसई आयएक्स आणि सिंगापूरच्या एसजीएक्समध्ये करार झाला आहे. एसजीएक्स निफ्टीचे सभासद थेट एनएसई आयएक्सवर गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रेड करु शकतील. एनएसई आयएफएससीकडून क्लिअरिंग आणि सेटलमेंटची प्रोसेस पूर्ण केली जाईल.  

गिफ्ट निफ्टीमुळे आर्थिक व्यवहार करणारा एक आघाडीचा मंच अशी जागतिक पातळीवर गिफ्ट सिटीची ओळख होईल, असा विश्वास एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान यांनी व्यक्त केला.

एसजीएक्स निफ्टी गिफ्ट सिटीत आल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आता थेट भारतात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी आणि बँक निफ्टी असे दोन डेरिव्हेटिव्हज फ्युचर्स अॅंड ऑप्शन प्रकारात ट्रेड सुरु आहेत.