Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMBJP : जनऔषधी योजनेत मधुमेहासह नवीन उत्पादनांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

PMBJP : जनऔषधी योजनेत मधुमेहासह नवीन उत्पादनांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

सर्व सामान्यांना स्वस्त दरात औषधी उपलब्ध व्हावी या हेतून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची (PMBJP) सुरूवात केली. आज या योजनेमार्फत वेगवेगळ्या आजारावरील औषधं नागरिकांना अल्प दरात मिळत आहेत. या योजनेद्वारे आता काही नवीन उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. ती औषधं कोणती आहेत? हे आपण पाहूया.

दवाखाना म्हटलं की सर्वांनाच तो नकोसा वाटतो. पण, परिस्थितीनुसार त्याचा वापर करावा लागतो. कारण, आजार जर हाताबाहेरचा असेल तर अमाप पैसा तो बरा करण्यासाठी ओतावा लागतो. यात या गोष्टी सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. यामुळे केंद्र सरकारने जनऔषधी योजना सुरू केली. या योजनेत आधीच 1800 पद्धतीचे औषधं आहेत. त्याचबरोबर यामध्ये 285 शस्त्रक्रिया उपकरणांचा ही समावेश आहे. आता केंद्र सरकारने यामध्ये नवीन उत्पादनांचा समावेश केला असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.

'ही' आहेत नवीन औषधं

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) व्यवस्थित राबवण्यासाठी  भारतीय औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे कार्यालय (PMBI) दिवसरात्र मेहनत करत असते. या कार्यालयाद्वारे न्यूट्रास्युटिकल्स व काही इतर महत्वाच्या उत्पादनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या यादीत 8 औषधांचा समावेश आहे यामध्ये डॅपाग्लायफ्लोझीन 10 मिलीग्राम, मेटफार्मिन हाइड्रोक्लोराइड 1000 मिलीग्राम ही मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधे तसेच, महिलांसाठी जन औषधी प्रोटीन पावडर, डायबेटिज केअर प्रोटीन पावडर, रिनल केअर प्रोटीन पावडर, डायलेसिस रुग्णासाठी वेगळं रिनल केअर प्रोटीन पावडर आणि जनऔषधी पोषण यासारख्या नव्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. कारण, यातील काही गोष्टी मधुमेहाच्या आजारासाठी महत्वाच्या आहेत. तसेच, मार्केटमध्ये यांचा दर जास्त असल्यामुळे ही औषधं प्रत्येकाला परवडण्याजोगी नाही आहेत. त्यामुळे या औषधांनाही यात स्थान देण्यात आले आहे. खाली औषधांची यादी किमतीसह दिली आहे.

PMBJP (Internal Image)
Source: www.pib.gov.in

औषधं माफक दरात उपलब्ध

ही सुविधा सर्वच नागरिकांपर्यत पोहचावी यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात 10,000 जनऔषधी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. जनऔषधी केंद्राची आकडेवारी बघितल्यास 30 जून 2023 पर्यंत एकूण 9512 जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेच्या (PMBJP) उत्पादन यादीमध्ये आधीच 1800 औषधे, 285 शस्त्रक्रिया उपकरणे आणि गरजेच्या उपभोग्य वस्तूंचा समावेश आहे. ही उत्पादने जनऔषधी केंद्रात मार्केटमध्ये मिळाणाऱ्या औषधाच्या तुलनेत 50 % - 90 % सवलतीत उपलब्ध आहेत.