Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Moto G54 5G sale: मोटो G54 5G आज खरेदी करता येणार, जाणून घ्या किंमत, ऑफर्स

Moto G54 5G

Image Source : www. reliancedigital.in

मोटोने या महिन्यात दुसऱ्यांदा त्यांचा फोन ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे तुम्ही मोटोचे चाहते असल्यास, ही संधी सोडू नका. आज दुपारी 12 वाजतापासून तुम्ही फ्लिपकार्टवरुन (Flipkart) फोन खरेदी करु शकणार आहात. तेही भन्नाट ऑफर्ससह, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Moto G54 5G sale: मोटोरोलाने Moto G54 5G सेलमध्ये उपलब्ध करुन, चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कारण, हा फोन यंदाच भारतात लाॅंच करण्यात आला होता. तसेच, मागील आठवड्यात तो विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोटोच्या चाहत्यांना फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करता येणार आहे. 

कारण, कंपनी आज दुपारी 12 वाजतापासून खरेदीसाठी Moto G54 5G उपलब्ध करुन देणार आहे. तसेच तुम्ही मोटोच्या अधिकृत वेबसाईटवरुनही फोन खरेदी करु शकणार आहात.

तुम्ही मार्केटमध्ये 5G फोन शोधत असाल तर Moto G54 हा तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. कारण, यात तुम्हाला स्नॅपड्रॅगन चिपसेट, सुपर-स्मूथ डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा सेटअप, स्टीरिओ स्पीकर्स आणि जबरदस्त पावरची बॅटरी मिळणार आहे. तसेच, तुम्हाला यावर मिळणाऱ्या ऑफर्सचाही लाभ घेता येणार आहे.

स्वस्तात खरेदी करता येणार

तुम्ही Moto G54 5G आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईवरून खरेदी करु शकणार आहात. मोटोचे बेस 8GB/128GBमाॅडेल Moto G54 5G ची किंमत भारतात 15,999 रुपये आहे. तसेच तुम्ही Moto G54 5G फोन 12GB/256GB या व्हेरियंटमध्येही घेऊ शकणार आहात. 

तो तुम्हाला 18,999 रुपयांना मिळणार आहे. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरुन आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून घेतल्यास, तुम्हाला यावर 1,500 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ ही घेता येणार आहे. याशिवाय फोनचे कलर्स पाहायला गेल्यावर तुम्हाला यात मिंट ग्रीन, पर्ल ब्लू आणि मिडनाईटब्लू उपलब्ध आहे.

या खास गोष्टींचा मिळणार लाभ

मोटो G54 5G मध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 7020 प्रोसेसर IMG BXM-8-256 GPU सह मिळत आहे. याशिवाय 12GB रॅम आणि 256GB चा स्टोअरेज उपलब्ध होणार आहे. तसेच, फोनला 6,000 mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याबरोबर तुम्ही 33W वेगाने फोन चार्जिंग करु शकणार आहात. त्यामुळे वारंवार चार्जिंग करायचे टेन्शन तुम्हाला राहणार नाही.

तसेच या फोनमध्ये 50 MP प्रायमरी सेन्सर आणि f/1.8 अपर्चर तसेच 8 MP अल्ट्रावाईड लेन्ससह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय 16 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच, Moto G54 5G ला 6.5 इंचाचा FHD+ IPS एलसिडी पॅनेल आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. त्यामुळे फोन वापरताना तुम्हाला स्मूथ डिस्प्लेचा आनंद घेता येणार आहे. 

त्यामुळे तुम्ही जर कमी बजेटमध्ये 5G फोन घेण्याचा विचार करत असल्यास, हा फोन तुमच्यासाठी बेस्ट ठरु शकतो. कारण, मोटोच्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. Moto G54 5G अँड्रॉईड 13 वर चालतो. मोटोरोलाने डिव्हाईसला अँड्रॉईड 14 अपडेट आणि तीन वर्षे नियमित सुरक्षा अपडेट मिळणार असल्याचे सांगितले आहे.