• 05 Jun, 2023 19:43

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Expensive Share: हे आहेत भारतातील सर्वांत महागडे शेअर्स!

Most Expensive Share

Most Expensive Share: मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड कंपनीचा MRF हा शेअर भारतातील सर्वांधिक महागडा शेअर आहे. हा शेअर 3-4 दिवसांपूर्वी 1 लाखाचा टप्पा पार करणार होता. याव्यतिरिक्त आणखी कोणत्या कंपन्यांचे शेअर्स महागडे आहेत, हे आपण पाहणार आहोत.

Most Expensive Share in India: मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड कंपनीचा MRF Ltd हा शेअर भारतातील सर्वांत महागडा शेअर आहे; या शेअरची आजची (दि. 11 मे 2023) किंमत 97,323 रुपये इतकी आहे. जो 3 दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी (दि. 8 मे) इंट्राडेमध्ये 99,933.50 रुपये इतक्या किमतीवर पोहोचला होता. त्यादिवशी एमआरएफ कंपनीचा शेअर हा 1 लाखाला टच करणार अशी स्थिती होती. पण तो त्यानंतर खाली आला. सध्या आजच्या घडीला एमआरएफ लिमिटेड कंपनीचा शेअर भारतातील सर्वांत महागडा शेअर आहे.

एमआरएफ व्यतिरिक्त आणखीही अशा काही कंपन्या आहेत. ज्या कंपन्यांच्या शेअरची किंमत सर्वसामान्य गुंतवणूकदाराला परवडत नाही. आज आपण भारतातील अशाच टॉप 10 महागाड्या शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

MRF (Madras Rubber Factory)

मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड कंपनीने जेव्हा मार्केटमध्ये आयपीओ आणला होता. तेव्हा एमआरएफ कंपनीच्या एका शेअरची किंमत 11 रुपये होती. ती 2023 मध्ये 99 हजारापर्यंत पोहोचली आहे. आज एमआरएफ कंपनीचा शेअर 97,323 रुपयांवर ट्रेड करत होता. एमआरएफ कंपनी गाड्यांच्या टायरची निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनी दोन चाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने, ट्रक, ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांचे टायर्स बनवतात. टायर मार्केटमधील जवळपास 29 टक्के मार्केट हे एमआरएफकडे आहे. या व्यतिरिक्त एमआरएफ ग्रुप कंपनीज् कलर, लहान मुलांची खेळणी, पझल गेम्स याची सुद्धा निर्मिती करते.

Page Industries Ltd

तुम्हाला अमेरिकेतील प्रीमिअम अंडरगारमेंट्सची निर्मिती करणाऱ्या जॉकी या ब्रॅण्डचे नाव नक्की ऐकले असेल. तर पेज इंडस्ट्रीज या भारतातील कंपनीला भारतासह नेपाळ, बांगलादेश, युएई आणि श्रीलंकामध्ये जॉकी ब्रॅण्डचे प्रोडक्टस तयार करण्याचे आणि विकण्याचे अधिकार आहेत. त्याचबरोबर पेज इंडस्ट्रीजकडे स्पीडो इंटरनॅशनल (Speedo International)च्या भारतातील निर्मितीचे आणि विक्रीचे राईट्स आहेत. त्यामुळे कंपनीला चांगला नफा मिळत असून पेड इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर भारतातील महागड्या शेअर्समध्ये मोडला जातो. पेज इंडस्ट्रीजच्या आजच्या (दि. 11 मे, 2023) शेअर्सची किंमत 41,326 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. या शेअर्सने आतापर्यंत 54,026.55 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. तर सर्वांत निचांकी दर 240 रुपये होता.

Honeywell Automation India Ltd 

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड ही कंपनी हेल (HAIL) या नावाने ओळखली जाते. हेल ही कंपनी टाटा ग्रुप आणि हनीवेल यांचे जॉईंट व्हेन्चर असून त्याची निर्मिती 1987 मध्ये केली होती. 2004 मध्ये हेल कंपनीने टाटाकडून उर्वरित शेअर्स खरेदी करून कंपनीवर पूर्ण मालकी मिळवली आहे. कंपनी सध्या ऑईल अॅण्ड गॅस, पेपर आणि प्रिंटिंग, पॉवर जनेरशन आणि ट्रान्समिशन, इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, फायर डिटेक्शन सिस्टिम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोगॅमिंग क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड कंपनीचा शेअर आज (दि. 11 मे, 2023) 37,201 रुपयेवर ट्रेड करत आहे. या शेअरने आतापर्यंत 49,990.00 रुपये किमतीचा उच्चांक गाठला आहे. तर या कंपनीचा सर्वांत निचांकी दर 90 रुपये आहे.

Shree Cement Ltd

श्री सिमेंट लिमिटेड कंपनी ही भारतातील नावाजलेली कंपनी असून तिचे 6 राज्यांमध्ये युनिट्स आहेत. सध्या या कंपनीचे भांडवल 1 ट्रिलिअन घरात आहे. तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल आणि त्यात आयपीएलमधील सीएसके टीमला सपोर्ट करणारे असाल तर तुम्हाला श्री सिमेंट कंपनी नक्कीच माहित असेल. श्री सिमेंट ही सध्याच्या सीएसके टीमची ऑफिशिअल पार्टनर आहे. श्री सिमेंट कंपनीचा शेअर आज (दि. 11 मे, 2023) 24770.10 रुपयांवर ट्रेड करत होता. या कंपनीचा शेअर आतापर्यंत 31,000 रुपयापर्यंत वर गेला होता. तर त्याची आतापर्यंतची निचांकी किंमत 223.25 रुपये इतकी होती.

3M India Ltd

3 एम इंडिया लिमिटेड ही कंपनी 1987 मध्ये बिर्ला 3एम लिमिटेड कंपनी म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. जसे की, ऑटोमोटीव्ह, आरोग्य, इलेक्ट्रॉनिक्स, वाहतूक सेव इत्यादी. सध्या 3एम इंडिया कंपनीच्या एका शेअरची किंमत 23,649 रुपये (दि. 11 मे रोजी) आहे. हा शेअर 31,000 रुपयांपर्यंत हाय गेला होता तर त्याचा निचांकी दर 223.25 रुपये होता.

Nestle India Ltd 

नेस्टले इंडिया लिमिटेड ही कंपनी नेस्टले एसए (Nestle SA) कंपनीची उपकंपनी असून, ती जगातील सर्वांत मोठी फूड निर्मिती कंपनी मानली जाते. स्वित्झर्लंडमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीचे भारतातील नेस्टले इंडिया कंपनीत 62 टक्के वाटा आहे. नेस्टले इंडिया कंपनीचा शेअर आज 22,000 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचा आतापर्यंतचा उच्चांक 22,300 रुपये असून निचांकी दर 2,295 रुपये आहे.

Highest Share Price In India

Abbott India Ltd

अबॉट इंडिया लिमिटेड कंपनी ह आंतरराष्ट्रीय पातळीवर फार्मसीमध्ये चांगला व्यापार करणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1944 मध्ये झाली होती. सध्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21,208 रुपये असून, त्याचा सर्वांत उच्च दर 23,934.45 रुपये होता. तर निचांकी दर 219.48 रुपये होता.

Bosch Ltd

Bosch लिमिटेड ही कंपनी टेक्नॉलॉजीसह, ग्राहकांचे प्रोडक्ट्स, ऊर्जा आदी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या कंपनीचा शेअर भारतातील महागड्या शेअर्समध्ये येतो. सध्या Bosch कंपनीचा शेअर 19,509 रुपयांवर (दि. 11 मे) ट्रेड करत आहे. या शेअर 27,990 रुपयांपर्यंत हाय गेला होता तर 157 रुपये त्याचा आतापर्यंतचा निचांकी दर आहे.

Procter & Gamble Hygiene & Health Care Ltd

पी अ‍ॅण्ड जी हायजीन अ‍ॅण्ड हेल्थ केअर ही कंपनी भारतातील टॉप 10 एफएमसीजी कंपनीपैकी एक कंपनी आहे. या कंपनीचे बऱ्यापैकी प्रोडक्ट हे सर्वसामान्या कुटुंबांमधून वापरले जातात. या कंपनीचा शेअर आज (दि. 11 मे) 13,800 रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर आतापर्यंत 16,448.70 रुपयांवर गेला होता आणि त्याचा सर्वांत निचांकी दर 226.02 रुपये होता.

Kama Holdings Ltd

कामा होल्डिंग लिमिटेड कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. जसे शिक्षण, रिअल इस्टेट आणि गुंतवणूक. या कंपनीवर अरुण भारत राम कुटुंबाचा ताबा आहे. सध्या कामा होल्डिंग कंपनीचा शेअर 12,570 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर 14,600 रुपये तर निचांकी दर 99.80 रुपये आहे.