इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रास इनक्युबेटेड फर्मने 'BharOS' ही स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम यूजर्सना हाय-टेक सुरक्षा आणि गोपनीयता प्रदान करते. BharOS या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमचा भारतातील 100 कोटी मोबाइल फोन यूजर्सना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. BharOS नावाचे सॉफ्टवेअर व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ उपकरणांवर स्थापित केले जाऊ शकते. हे यूजर्ससाठी सुरक्षित वातावरण प्रदान करते आणि 'आत्मनिर्भर भारत' साठी एक महत्त्वाचे साधन ठरू शकते.
BharOS विषयी …
आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी या स्वदेशी स्वयंपूर्ण मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमची माहिती दिली आहे. व्ही. कामकोटी म्हणाले की BharOS वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण आणि लवचिकता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. सध्या ज्या संस्थांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची नितांत गरज आहे अशा संस्थांना स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम BharOS च्या सेवा पुरवल्या जात आहेत.
खरं तर, या संस्थांचे यूजर्स संवेदनशील माहिती हाताळतात आणि यासाठी मोबाइलवरील प्रतिबंधित अॅप्सवर खाजगी संप्रेषण आवश्यक आहे. अशा यूजर्सना खाजगी 5G नेटवर्कद्वारे खाजगी क्लाउड सेवेमध्ये प्रवेश आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ही स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम अधिक विश्वासार्ह मानली जात आहे.यूजर्सना मिळेल हायटेक सुरक्षा आणि गोपनीयता यूजर्सना ते अॅप्स वापरण्याची सक्ती केली जात नाही जी त्यांना परिचित नाहीत किंवा ते सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित मानत नाहीत आणि त्या अॅप्सवर विश्वास ठेवू शकत नाहीत. याशिवाय, ही ऑपरेटिंग सिस्टम यूजर्सना त्यांच्या डिव्हाइसमध्ये असलेल्या अॅप्सवर अधिक नियंत्रण देते.हे सॉफ्टवेअर JNDK Operations Pvt ने विकसित केले आहे, जे IIT Madras Innovative Technologies Foundation ने विकसित केले आहे. ही आयआयटी मद्रासची नफा नसलेली कंपनी आहे.