भारतात स्मार्टफोन्सची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता प्रमुख स्मार्टफोन उत्पादक कंपन्या नवनवीन मॉडेल्स बाजारात लॉंच करत आहेत. सध्या मार्केटमध्ये 5G मोबाईल्सचा बोलबाला आहे. जुलै महिन्यात सॅमसंग, रिअलमी, वन प्लस या कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार आहेत. 5G मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांसाठी जुलै महिना पर्वणी ठरणार आहे.
Table of contents [Show]
सॅमसंग गॅलक्सी M34
सर्वात मोठ्या स्मार्टफोन उत्पादकांपैकी एक असलेल्या सॅमसंगने M34 जुलै महिन्यात लॉंच करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंग M34 हा 6000 mAh बॅटरी आणि ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला फोन आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी आवश्यक असलेले OIS वैशिष्ट्य या फोनमध्ये आहे. M34 हा 5G मोबाईल असून 6.6 एचडी डिस्प्ले आहे.
आयक्यूओओ निओ 7 प्रो (iQOO Neo 7 Pro)
तब्बल 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि OIS वैशिष्ट्याचा समावेश असलेला iQOO Neo 7 Pro हा स्मार्टफोन जुलै महिन्यात लॉंच होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.78 एचडी अॅमोलाईड डिस्प्ले असून यातून फोन चांगला परफॉर्मन्स देईल, असा दावा कंपनीने केला आहे. iQOO Neo 7 Pro ची किंमत 40000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
नथिंग फोन 2
नथिंग फोन-2 (Nothing Phone-2) हा स्मार्टफोन जुलै महिन्यात भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. नथिंग फोन 2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगर 8 चा समावेश आहे. 6.7 इंचाच डिस्प्ले, 4700 mAh बॅटरी आणि अत्याधुनिक साउंड सिस्टम असलेला नथिंग फोन 2 हा 40000 ते 450000 रुपयांच्या दरम्यान असेल.
रिअलमी Narzo 60
रिअलमी कंपनीकडून Narzo सिरिजमधील नवीन स्मार्टफोन जुलै महिन्यात लॉंच केला जाण्याची शक्यता आहे. रिअलमी Narzo 60 या 5G फोनमध्ये 1 TB इतकी डेटा साठवणुकीची क्षमता असेल. कंपनीने यापूर्वी Narzo 60 फोनचा टीझर रिलीज केला होता. त्यात कंपनीने Narzo 60 मध्ये 250000 फोटो स्टोअर करता येतील, असा दावा केला आहे. Narzo 60 या स्मार्टफोनची किंमत किती असेल हे मात्र कंपनीने गोपनीय ठेवले आहे.
वनप्लस नॉर्ड 3
वनप्लस नॉर्ड 3 हा स्मार्टफोन जुलैमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. या मोबाईलची वैशिष्ट्ये काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लिक झाली होती. यात 6.74 इंचाच डिस्प्ले असून 1.5K रिझोल्यूशन आहे. वनप्लस नॉर्ड 3 या स्मार्टफोनची किंमत 30000 रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.